Others News

आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून दिले जातात. केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे अशी योजना आहे. भारतात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे.

Updated on 27 May, 2021 5:53 PM IST

आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून दिले जातात. केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना  अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे अशी योजना आहे. भारतात या योजनेचा लाभ घेणाऱ्या  शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे. परंतु या योजनेबद्दल तुम्हाला एक महत्वाचे वैशिष्ट्य माहित नसेल ते म्हणजे लाभार्थी शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर संबंधित लाभार्थ्यांचा वारस या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि हे खरं  आहे.

संबंधित लाभार्थ्यांच्या वारसांना  याचा लाभ मिळू शकतो परंतु त्यासाठी काय नियम लागू करण्यात आले आहेत व ते पाळणे तितकेच  महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण लाभार्थी शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याच्या वारसांना लाभ कसा मिळतो हे जाणून घेणार आहोत.

     

जर लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झा झाला तर संबंधित शेतकऱ्यांच्या वारसाला पी एम किसान पोर्टल वर स्वतःचे पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर कार्यप्रणालीप्रमाणे लाभार्थ्याच्या  वारसाची चौकशी केली जाते. या चौकशीमध्ये संबंधित लाभार्थी हा योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाते. ही सगळी प्रक्रिया  पी एम किसान पोर्टल वर नियमात राहून केली जाते. जर चौकशीत लाभार्थी द्वारे दिली गेलेली माहिती योग्य असेल तर योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये मिळणे सुरू होऊन जाते.

 

या योजनेचा फायदा कुणाला मिळत नाही

 केंद्र सरकार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून दहा हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळते किंवा कुठल्याही सरकारी पदावर कार्यरत आहेत किंवा एखाद्या  राजकीय पदावर आहेत तसेच डॉक्टर,  वकील इत्यादी ना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या योजनेचा लाभ फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना होतो.

 

English Summary: How can the beneficiaries of PM Kisan Yojana benefit the family after the death of the farmer?
Published on: 27 May 2021, 05:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)