Others News

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या आठवड्याच्या मध्यात शुक्र सिंह राशीत (Venus Leo) येऊन सूर्याची भेट घेणार आहे. असे मानले जाते की शुक्र आणि सूर्याचा संयोग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ असतो.

Updated on 29 August, 2022 6:19 PM IST

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या आठवड्याच्या मध्यात शुक्र सिंह राशीत (Venus Leo) येऊन सूर्याची भेट घेणार आहे. असे मानले जाते की शुक्र आणि सूर्याचा संयोग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ असतो.

या दोन ग्रहामुळे अनेक राशीच्या लोकांच्या कमाईत वाढ होते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी ऑगस्टचा शेवट आणि सप्टेंबरची सुरुवात कशी असेल? याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

​मेष

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या आठवड्यात कुटुंबात सुख-समृद्धी (Happiness and prosperity) राहील आणि मन प्रसन्न राहील. तब्येत खूप सुधारेल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. आर्थिक वाढीमध्ये चढ-उतार असतील पण शेवटी यश नक्की मिळेल. शुभ रंग: नारिंगी, भाग्यवान क्रमांक: ३

​वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या आठवड्यात कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती होईल आणि धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवासासाठी शुभ योगायोग घडून यशही मिळेल. शुभ रंग: जांभळा, भाग्यवान क्रमांक: ६

​मिथुन

मिथुन राशीच्या (Gemini) लोकांचे प्रेम संबंध मजबूत होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत हा काळ अनुकूल राहणार असून धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती करायची असेल संतुलन राखा. शुभ रंग: पांढरा, भाग्यवान क्रमांक: १०

​कर्क

सप्ताहाच्या सुरुवातीला गुंतवणुकीबाबत मनात शंका असू शकतात परंतु परिस्थिती नियंत्रणात राहील. कार्य क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी शुभ योगायोग तेव्हाच घडतील जेव्हा तुम्ही व्यापक दृष्टीकोनातून विचार करून निर्णय घ्याल. शुभ रंग: लाल, भाग्यवान क्रमांक: ८

Business Tips: 15 हजार रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत होणार कमाई

सिंह

आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे आणि तुम्हाला गुंतवणुकीतून लाभही मिळू शकतात. घरातील सामान खरेदी करण्यात व्यस्त असाल. आरोग्य सुधारेल आणि नवीन आरोग्य उपक्रम चांगले परिणाम देतील. शुभ रंग: गुलाबी, भाग्यवान क्रमांक: १

​कन्या

कामाच्या ठिकाणी संवादाने समस्या सोडवल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या मध्यात तब्येतीत सुधारणा होईल. या आठवड्यात केलेला प्रवास शुभ परिणाम देईल. शुभ रंग: बदामी, भाग्यवान क्रमांक: १२

​तूळ

धनवृद्धी सामान्य राहील. या आठवड्यात प्रवासाच्या माध्यमातून नवीन संधी मिळेल आणि चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीतही अनुकूल परिणाम होतील. शुभ रंग: निळा, भाग्यवान क्रमांक: ७

लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी वापरा 'हे' तंत्र

वृश्चिक

व्यवसायासंबंधी प्रवासाला जातांना एखाद्या कागदपत्रावर सही करावी लागत असेल, तर एखादी छोटीशी चूक नीट वाचली नाही तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात, त्यामुळे ​वृश्चिक राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते. शुभ रंग: हिरवा, भाग्यवान क्रमांक: ९

​धनु

प्रियजनांच्या उपस्थितीत तुम्ही आनंदी व्हाल. मन प्रसन्न राहील आणि आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे प्रकल्पाचे नुकसान होऊ शकते. शुभ रंग: आकाशी, भाग्यवान क्रमांक: २१

​मकर

आर्थिक संपत्ती वाढीसाठी शुभ संयोग आहेत आणि गुंतवणूक फायदेशीर (Investment is profitable) ठरू शकते. या आठवड्यात तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध रोमँटिक होतील आणि हळूहळू प्रेम वाढेल. शुभ रंग: राखाडी, भाग्यवान क्रमांक: ३

​कुंभ

कामाच्या संदर्भात मन उदास राहू शकते. प्रेमप्रकरणाच्या बाबतीत हा आठवडा चांगला असेल आणि तुम्ही रोमँटिक वेळ घालवाल. आपल्या शरीराला निरोगी ठेवा. कुटुंबातील परिस्थिती हळूहळू सुधारेल. शुभ रंग: क्रीम, भाग्यवान क्रमांक: १६

​मीन

मीन राशीच्या लोकांना आर्थिक दृष्टीकोनातून (Financial perspective) काळ अनुकूल असून धनवृद्धीसाठी शुभ संयोग घडत आहेत. महिलांच्या सहकार्याने हा आठवडा सुख-समृद्धी घेऊन येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. शुभ रंग: लाल, भाग्यवान क्रमांक: ५

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर
Cauliflower consumption: सावधान! प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबीचे सेवन केल्याने होतात गंभीर समस्या
सरल पेन्शन योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन

English Summary: Horoscope today September Read
Published on: 29 August 2022, 06:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)