Others News

होंडा कंपनीच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. Honda Motorcycle and Scooter India चे अध्यक्ष Asushi Ogata यांनी नुकतेच होंडा कंपनी देशात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणार असल्याची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यांनी पुष्टी केली आहे की, जपानी दुचाकी निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेतील EV सेक्टर मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असून काही दिवसात यासाठी कंपनी आता सज्ज आहे. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत ओगाटा यांनी सांगितले की, Honda Motorcycle & Scooter India पुढील आर्थिक वर्षात नवीन इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

Updated on 25 February, 2022 12:04 PM IST

मित्रांनो जसं की आपणांस ठाऊकच आहे की, पुढील आर्थिक वर्ष लवकरच सुरू होणार आहे. गेल्या वर्षी, Honda Benli इलेक्ट्रिक स्कूटर पुण्यातील ARAI च्या सुविधेत चाचणी साठी प्रथमच दिसली होती. Honda भारतीय मार्केटमध्ये बिझनेस टू बिझनेस प्रोडक्ट लाँच करणार नाही, पण कंपनीने बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानाची टेस्टिंग याआधीच सुरू केली आहे. यासाठी कंपनीने होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा.  लि. नावाची त्यांची एक उपकंपनी देखील सुरू केली आहे. ही कंपनी सध्या बंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरची पायलट प्रोजेक्टची चाचणी घेत आहे. आम्‍ही आपणांस सांगू इच्छितो की, बाउन्स इलेक्ट्रिकने सब्‍सक्रिप्‍शन आधारावर बॅटरी-स्‍ॅपिंग मॉडेल सादर केले आहे, याशिवाय हिरोने गोगोरोसोबतही याच कामासाठी भागीदारी केली आहे. ही गोष्ट स्पष्ट करते की, इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी बॅटरी स्वॅपिंग हा किफायतशीर आणि त्रासमुक्त पर्याय आहे.

असं सांगितलं जातं आहे की, जागतिक बाजारपेठेच्या स्कूटरच्या जागी होंडा भारतीय स्पेसिफिकेशनवाली स्कूटर इलेक्ट्रिक आवृत्तीमध्ये लॉन्च करणार आहे. यांसदर्भमध्ये भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये चर्चेला मोठे उधाण आले आहे. त्यामुळे होंडा कंपनी त्यांची बेस्ट सेलिंग स्कूटर एक्टिवाला इलेक्ट्रिक अवतारमध्ये लाँच करू शकते. यादरम्यान असं सांगितलं जातं आहे की, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक आणि आगामी काळात बाजारात दाखल होणारी सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिकशी होंडाची होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्पर्धा करेल. होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक बाजारात दाखल होण्याआधीच मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. 

याचे प्रमुख कारण म्हणजे ही स्कूटर भारतीय ग्राहकांना विशेषता भारतीय मध्यमवर्गीय लोकांना खूप आवडते आणि म्हणुनच तिचा इलेक्ट्रिक अवतार बाजारात येताच गेम चेंजर ठरू शकतो असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. यासोबतच ऑटोमोबाईल सेक्टरमधील जाणकार लोक सांगत आहेत की, भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी देत असलेल्या सबसिडीमुळे, आगामी काळात येणाऱ्या होंडा एक्टिवा इलेक्ट्रिकची किंमत खुपच कमालीची कमी होईल आणि त्यामुळे ही ऍक्टिवा मध्यमवर्गीय लोकांना विशेष परवडणारी असेल आणि बहुतेक मध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेट मध्ये फिट होणारी असेल.

English Summary: honda activa electric will launch on next year
Published on: 25 February 2022, 12:04 IST