भारतात प्रत्येक व्यक्ती हा आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न बघत असतो, पण प्रत्येकाला आपले स्वतःचे घर पैश्याअभावी बनवता येत नाही. त्यासाठी अनेक बँका आपल्या ग्राहकांसाठी होम लोन उपलब्ध करून देतात. पण त्याचा व्याजदर हा भिन्न भिन्न असतो.
सणासुदीच्या ह्या काळात अनेक बँका आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन आले आहेत आणि होमलोनचा व्याजदर हा त्यांनी कमी केला आहे. ह्यात एका विदेशी बँकाचा पण समावेश आहे. जाणुन घ्या कुठली बँक ही स्वस्त व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.
असं सांगितलं जात की, सणासुदीला कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरवात करावी, आपल्याकडे सोनं, चांदी, गाडी, मोटार अथवा घर सणासुदीच्या पवित्र तिथीला घेण्याची रीत आहे. आणि बँका देखील सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी बम्पर ऑफर घेऊन येतात. अलीकडेच काही बँकानी आपल्या सद्धयाच्या होमलोन वरील व्याजदरात कपात केली होती. आता ह्या यादीत विदेशी बँक एचएसबीसी (HSBC) आणि डोमेस्टिक बँक एस बँक (Yes Bank) ह्यांचा समावेश झाला आहे. ह्या बँकानी आपल्या होमलोनच्या व्याजदरात कपात केली आहे. ह्यामुळे ह्या बँकेच्या ग्राहकांसाठी सणासुदीला एक चांगली भेट मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
HSBC देणार स्वस्त मॉर्गेज लोन
HSBC ह्या विदेशी बँकेने भारतात आपले होमलोन वरील व्याजदरात कपात केली आहे. HSBC ही मूळची ब्रिटेनची बँक आहे आणि ही बँक आपल्या भारतातील ग्राहकांसाठी खास ही ऑफर घेऊन आलीय. ही बँक 6.45% वार्षिक व्याजदराने मॉर्गेज लोन (म्हणजेच संपत्ती गहाण ठेऊन मिळणारे लोन) उपलब्ध करून देणार आहे. ही बँक भारतातील सर्वात स्वस्त होमलोन देते. शिवाय ही बँक 31 डिसेंबर पर्यंत लोनसाठी लागणारी प्रोसेसिंग फी देखील घेणार नाही आहे. अर्थातच ह्यामुळे ग्राहकांचा डबल फायदा होणार आहे.
Yes Bank ने पण केली व्याजदरात कपात
फक्त HSBC च नाही तर येस बँकेने (Yes Bank) देखील आपले होमलोनचे व्याजदर कमी केले आहेत. बँकेकडून होमलोन आता 6.70% दराने मिळणार आहे. तर काम करणाऱ्या महिलांसाठी हा व्याज दर अजूनच कमी केला आहे म्हणजे व्याजदर हा कामकाजी महिलांसाठी जवळपास 6.65%असेल.
सणासुदीच्या ह्या सिजनला अनेक बँकानी आपला होमलोन वरील व्याजदर कमी केला आहे. ह्यामध्ये कोटक महिंद्रा, एसबीआय, एचडीएफसी, ह्यांचा देखील समावेश आहे.
Published on: 02 October 2021, 07:21 IST