आज-कालमहागाईजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये जर नवराबायको दोघे कमावती असतील तर बऱ्याच प्रमाणात आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते.
महिलांच्या बाबतीत विचार केला तर असे अनेक घरगुती व्यवसाय आहेत की तो व्यवसाय केल्याने कुटुंबाला आर्थिक मदत होऊ शकते. दररोजच्या कामामधून थोडा वेळ काढून जर महिलांनी असे घरगुती व्यवसाय केले तर सहजतेने असे व्यवसाय यशस्वी होऊ शकतात. या लेखात आपण खाद्यपदार्था संबंधित महिलांसाठी असलेले घरगुती व्यवसाय पाहणार आहोत.
मिठाईव्यवसाय- जर आपणास स्वादिष्ट मिठाई कशी बनवायची माहित असेल आणि ती बनवता येत असेल तर तुम्ही लग्न समारंभात सारखे अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मिठाई बनवून विकू शकता.
- जास्तीत जास्त पाच हजार रुपये भांडवल टाकून घरगुती व्यवसाय कमी करतात सुरू करता येतो.
- घरगुती मेस- जर आपण स्वयंपाक बनवायचा बाबतीत सुगरण असाल तर तुम्ही मेसचा व्यवसाय सुरू करू शकता.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ट्रेनिंग ची आवश्यकता नाही.फक्त स्वयंपाक बनवता येणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून तयार जेवण नोकरी करण्यासाठी आलेल्या किंवा शिक्षणासाठी शहरात असणाऱ्या व्यक्तींना डब्बा पुरवून मंथली मेसच्या माध्यमातुनकमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढा खर्च लागत नाही.
- लोणचे,पापड, शेवया आणि तूप उत्पादन व्यवसाय- घरी बनवलेले लोणचे आणि तूप बऱ्याच लोकांना पसंत असतात. बरेच लोक ते खरेदी करणे पसंत करतात.म्हणून जरघरगुती लोणचे,पापड,शेवया आणि तूपयापैकी मला काही बनवता येत असेल तर आपण ते बनवून देऊ शकताव चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 3000 ते 5000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. या व्यवसायातून तुम्ही 30 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतात.
- घरगुती केक बनवण्याचा व्यवसाय- सध्या शहरी किंवा ग्रामीण भागात बऱ्याच प्रमाणात केक बनवण्याचा व्यवसाय नावारूपास येत आहे.बऱ्याच गृहिणी घरगुती केक बनवून विकतात. आपल्याला केक बनवता येत असेल तर आपण तो विकून चांगला व्यवसाय उभारू शकता सोशल मीडिया साईटचा वापरकरून हा व्यवसायचांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकतो.तसेच आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच ऑर्डरी मिळू शकतात.तसेच एखादे चांगले सुसज्ज शॉप उभे करूनकेक विक्रीचा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी पाच हजार ते दहा हजारांचा खर्च येतो व मिळणारा नफा हा 20 ते 30 टक्क्यांपर्यंत असतो.
Published on: 04 September 2021, 12:33 IST