मित्रांनो भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात हिरो कंपनीने (Hero) आपले वर्चस्व कायम राखले आहे. हिरो कंपनी टू व्हीलर सेगमेंटमधील एक नामांकित कंपनी आहे. कंपनीची स्प्लेंडर प्लस ही बाईक लोकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
स्प्लेंडर प्लस बाइक आपल्या दमदार मायलेज मुळे आणि शानदार लोकांमुळे मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत ठरली आहे. ही बाईक कंपनीची बेस्ट सेलिंग बाईक आहे एवढेच नाही तर देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टू व्हिलर गाड्यांच्या यादीत कायमच शीर्षस्थानी राहिली आहे. मित्रांनो जर आपणास देखील स्प्लेंडर प्लस बाइक खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी विशेष खास आहे.
Hero MotoCorp ची लोकप्रिय बाईक Hero Splendor Plus आपल्या मायलेज आणि स्टायलिश डिझाइनसाठी तरुणांची पहिली पसंती राहिली आहे. जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी करायचा प्लॅन बनवला तर तुम्हाला यासाठी जवळपास 90 हजार ते 94 हजार रुपये खर्च करावे लागतील, परंतु तुमच्याकडे जर एवढे पैसे नसतील तर चिंता करू नका.
आज आम्ही तुम्हाला ही बाईक आपण स्वस्तात कशी खरेदी करू शकता याविषयी सांगणार आहोत. मित्रांनो जर आपणास ही गाडी नव्याने खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा नसेल तर आपण ही स्प्लेंडर प्लस बाईक सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता ते ही मात्र 25,000 रुपयात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या स्पेशल ऑफर विषयी.
Hero Splendor Plus या बाईकवर सेकंड हँड वाहन खरेदी आणि विक्री QUIKR या वेबसाइटवर एक भन्नाट ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे, या वेबसाईटवर या बाईकचे 2012 चे मॉडेल सूचीबद्ध करण्यात आले आहे. या बाईकची किंमत येथे 15,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु त्यासोबत कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर उपलब्ध होणार नाही.
दुसरी ऑफर CARANDBIKE वेबसाइटवर देण्यात आली आहे, येथे या बाईकचे 2014 मॉडेल सूचीबद्ध केले आहे. या बाईकची किंमत 18,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यासोबत कोणतीही योजना किंवा ऑफर दिली जाणार नाहीत.
तिसरी ऑफर हीरो स्प्लेंडर प्लस वर DROOM वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे, जिथे या बाईकचे 2013 मॉडेल सूचीबद्ध आहे. त्याची किंमत 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅन देखील मिळेल.
Published on: 09 June 2022, 05:55 IST