मुंबई: हीरो मोटोकॉर्प देशातील अग्रगण्य मोटोकोर्प कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची हिरो स्प्लेंडर ही गाडी भारतातील मध्यमवर्गीय लोकांना विशेष पसंत आहे, आणि म्हणूनच की काय ही बाईक देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टू-व्हिलर गाड्यांच्या यादीत शीर्षस्थानी विराजमान आहे. ही गाडी आपल्या दमदार मायलेज मुळे, आकर्षक लूक मुळे आणि पावरफूल इंजिन मुळे लोकांमध्ये विशेष पॉप्युलर झाली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 70 हजार रुपयांहुन अधिक आहे.
मित्रांनो जर आपणास हिरो कंपनीची हिरो स्प्लेंडर ही दमदार गाडी खरेदी करायची असेल मात्र एवढी मोठी रक्कम आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण जुनी अर्थात सेकंड हॅन्ड हिरो स्प्लेंडर गाडी खरेदी करून आपले स्वप्न पूर्ण करू शकता. मित्रांनो सेकंड हॅन्ड हिरो स्प्लेंडर गाडीसाठी ओएलएक्स कंपनीने एक भन्नाट ऑफर आली आहे, या ऑफर द्वारे आपण निम्म्याहुन कमी किमतीत स्प्लेंडर खरेदी करू शकता. या ऑफर विषयी जाणून घेण्याआधी आपण या गाडीच्या स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.
हिरो स्प्लेंडर स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स: हिरो कंपनीची Hero Splendor या गाडीमध्ये 97.2cc इंजिन कंपनीने दिले आहे. हे दमदार इंजिन 8.36Ps पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या बाईकचे ब्रेकिंग सिस्टम उत्तम आहे, बाईकला मागे आणि पुढे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 80 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.
OLX वेबसाइटवर चालू असलेली ऑफर: OLX वर सेकंड हॅन्ड हिरो स्प्लेंडर बाईक विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे, वेबसाईटवर 2010 या वर्षाचे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. ही स्प्लेंडर बाईक 27,500km धावली असल्याचे वेबसाईट वर नमूद करण्यात आले आहे आणि या हीरो स्प्लेंडर बाइकसाठी 18,500 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, DROOM वेबसाईटवर देखील आहे एक ऑफर: DROOM या वेबसाईटवर देखील एक सेकंड हिरो स्प्लेंडर गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे. या वेबसाईटवर 2009 वर्षाची रजिस्टर गाडी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. ही गाडी मात्र 23 हजार किलोमीटरच धावली आहे, आणि या गाडीसाठी 20 हजार 685 रुपये एवढी किंमत ठेवली आहे.
Published on: 04 March 2022, 01:58 IST