मुंबई: देशातील अग्रगण्य टू व्हीलर मोटोकॉर्प कंपनी अर्थात हिरोने बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांचे चलन पाहून आपली एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. हिरो कंपनीने नुकतेच आपली Hero Eddy की इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने या स्कूटरला लाँच केले आणि ही स्कूटर ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये चर्चेचा विषय ठरली. हिरोची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ज्या लोकांना जवळच रोजाना प्रवास करावा लागतो अशा लोकांसाठी किंवा शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. हिरोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या स्टायलिश लूकमुळे मध्यमवर्गीय लोकांची लवकरच पहिली पसंत सिद्ध होऊ शकते असे सांगितले जात आहे. Hero Eddy या हिरो चा नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 72 हजार रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. आपल्या स्टाइलिश लुक मुळे, व आपल्या फिचर्समुळे ही स्कूटर चालकाला एक वेगळाच अनुभव प्रदान करू शकते असा कंपनीचा दावा आहे.
या स्कूटर ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या स्कूटरला चालवण्यासाठी कुठल्याच परवान्याची आवश्यकता नाही तसेच या स्कूटरला कोठेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. म्हणजेच या स्कूटरला चालवण्यासाठी चालकाला ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य राहणार नाही, कारण की हिरोची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लो स्पीड स्कूटर आहे त्यामुळे या गाडीला चालवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता नसते. कंपनीने ग्राहकांच्या आवडीनुसार या स्कूटरला दोन कलर मध्ये बाजारात दाखल केले आहे, ही स्कूटर पिवळ्या आणि निळ्या रंगात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ज्या लोकांना रोजाना कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागतो अशा लोकांसाठी ही स्कूटर एक वरदान सिद्ध होऊ शकते मात्र ज्या लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो अशा लोकांसाठी ही स्कूटर कदापि चांगली ठरू शकत नाही. हिरोची हि स्कूटर एकदा चार्ज केल्यास किती किलोमीटर धावू शकते याबाबत कंपनीने कुठल्याच खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने या स्कूटरच्या काही ठळक वैशिष्ट्येबद्दल खुलासा केला आहे.
कंपनीच्या मते, या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये फाइंड माय बाइक, ई-लॉक, लार्ज बूट स्पे, फॉलो मी हेडलॅम्प्स आणि रिव्हर्स मोड इत्यादी हायटेक फीचर्स लोड करण्यात आले आहेत. या फिचर्समुळे ही स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालू शकते असा तज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चिंग वेळी, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पॉल्युशन कंट्रोल करण्यासाठी हिरो प्रयत्नरत असल्याचे नमूद केले, ही स्कूटर देखील त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.
Published on: 03 March 2022, 10:29 IST