Others News

देशात येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे, पेट्रोलच्या व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांना खूप मागणी असल्याचे बाजारात बघायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेता, भारतातील अनेक बड्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची लॉन्चिंग करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात तर उतरविले जातच आहे याशिवाय अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांना सुविधा प्रदान करण्यात देखील अग्रेसर आहेत. यामुळेच भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन कंपनी म्हणून ओळखली जाणारी हिरो इलेक्ट्रिकने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत पार्टनरशिप केल्याचे समजत आहे.

Updated on 13 February, 2022 2:57 PM IST

कंपनीच्या मते, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना फायनान्सिंग सुविधा मिळवून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत पार्टनरशिप केली आहे. यामुळे हीरो इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी फायनान्स ची सुविधा उपलब्ध होणार आहे याशिवाय हीरो इलेक्ट्रिक खरेदी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अनेक ऑफर देखील चालवल्या जाणार आहेत ज्यामुळे हीरो इलेक्ट्रिकचे वाहन कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते. हीरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत केलेल्या पार्टनरशिप मुळे संपूर्ण भारतात कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होणार असल्याचे समजत आहे.

Hero Electric चे CEO सोहिंदर गिल म्हणतात, “आज EVs अर्थात इलेक्ट्रिक वेहिकलला खूप मागणी आहे आणि खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी आणि चांगली बनवण्यासाठी, SBI या भारतातील सर्वात मोठ्या बँकसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी हरित गतिशीलता क्रांतीला चालना देण्यासाठी सर्वोत्तम व्याज दर आणि अद्ययावत ऑफर देईल."

2000 रुपयापर्यंत मिळणार सूट 

कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, Hero Electric खरेदी करणाऱ्या ग्राहकांना SBI च्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म YONO द्वारे केलेल्या पेमेंटवर अतिरिक्त रु 2,000 सूट मिळेल. एवढेच नाही तर, असोसिएशन ग्राहकांना एका क्लिकवर पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस दुचाकी कर्जाचा पर्याय निवडण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे.

हिरो इलेक्ट्रिकच्या म्हणण्यानुसार सर्व Hero Electric 750+ टचपॉइंट्सवर फिजिकल मदत आणि ऑफलाइन फायनान्स मिळू शकतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती केवळ इंटरनेटवरून जमा केलेल्या माहितीच्या आधारावर सामान्य माहिती प्रदान करते. सदर लेखात उल्लेख केलेल्या वित्तीय बाबींविषयी संबंधित कंपनीशी संपर्क करूनच कुठलाही वित्तीय व्यवहार पूर्णत्वास आणावा. कृषी जागरण मराठी लेखात दिलेल्या दाव्यांची अथवा माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: hero electric did partenership with sbi
Published on: 13 February 2022, 02:57 IST