देशात सध्या इलेक्ट्रिक बाइकचा वापर वाढला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना पेट्रोल बाईक परवडत नाही त्यामुळे इलेक्ट्रिक बाईकच्या वापरात वाढ नमूद करण्यात आली आहे. म्हणूनच हिरो आणि महिंद्रा या कंपनीने आपल्या स्ट्रॅटेजिक भागीदारी अंतर्गत एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.
ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑप्टिमा या नावाने बाजारात दाखल झाली आहे. ऑप्टिमा इलेक्ट्रिक स्कूटर मध्य प्रदेश येथे मॅन्युफॅक्चर होत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महिंद्रा आणि हिरो या दोन्ही कंपनीची नुकतीच भागीदारी झाली आहे. या दोन्ही कंपन्यांची भागीदारी ही पाच वर्ष चालणार आहे. या भागीदारीच्या काळात सुमारे दीडशे कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे लक्ष्य या कंपन्यांनी ठेवले आहे. महिंद्रा सोबत केलेल्या या पार्टनरशिप मध्ये हिरो कंपनी दरवर्षी 10,000,00 इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक टू व्हीलर साठी संपूर्ण देशात सप्लाय चेन विकसित करणार असल्याचे सांगितले जात आहे.
ऑप्टिमा स्कूटर विषयी महत्वाचे
हिरो कंपनी ने ऑल न्यू ऑप्टिमा नामक इलेक्ट्रिक स्कूटर गत वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित केली होती. तेव्हापासून या स्कूटरच्या लॉन्चिंग विषयी जोरदार चर्चा संपूर्ण देशात रंगली होती. ऑप्टिमा एलेक्ट्रिक स्कूटर मध्ये हिरोने जबरदस्त फिचर लोड केले आहेत.
या स्कूटरमध्ये कंपनीने क्रूझ कंट्रोल नामक फिचर लोड केले आहे जे की स्कूटर चालकास एकसारखी स्पीड देण्यास सक्षम असणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे गाडी चालक आपल्या सोयीनुसार स्पीड सेट करू शकतो. या फंक्शनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्कूटर मध्ये एक नेव्हिगेशन बटन देखील देण्यात आले आहे. या फिचरला ऍक्टिव्हेट केल्यानंतर स्पीडोमीटर मध्ये एक सिम्बॉल दिसतो. या फंक्शनला आपल्या सोयीनुसार ब्रेक द्वारे किंवा थ्रोटलद्वारे केव्हा ऍक्टिव्हेट केले जाऊ शकते. या स्कूटर ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही स्कूटर चांगली मायलेज देण्यास सक्षम आहे.
ऑप्टिमा स्कूटरला एकदा चार्ज केल्यास ही स्कूटर 82 किलोमीटरपर्यंत धावते. कंपनीनुसार या स्कूटरला चार्ज करण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागतो. ब्रेकिंग साठी या स्कूटरमध्ये पुढे ब्रेक ड्रम आणि मागे देखील ब्रेक ड्रम उपलब्ध करून दिला आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 55 हजार आठशे रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या स्कूटरला 4 कलर मध्ये उपलब्ध करून दिले आहे.
Published on: 09 February 2022, 12:52 IST