भारतीय हवामान विभाग,अमरावती जिल्ह्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ४० ते ५३ टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता २५ ते ३१ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग सरासरी ताशी ५ ते ६ कि.मी तास राहील.दिनाक ७ जून ते ९ जून २०२२, दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ तसेच हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दिनांक १० जून आणि ११ जून २०२२, ला एक ते दोन ठिकाणी (तुरळक ठिकाणी) विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आकाश ढगाळ राहील.कृषी हवामान सल्ला- वरील हवामान अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. समाधानकारक पाऊस सलग तीन दिवस (८० - १०० मि मी पेक्षा जास्त ) , मातीतील ( ओलावा अडीच ते तीन फूट पर्यंत )या बाबी पेरणीसाठी निर्णायक आहेत, म्हणून पेरणी करताना या दोन्ही बाबींची खात्री करून पेरणीचा निर्णय घ्यावा. सध्याच्या परिस्थिती नुसार १८ जुन पर्यंत शेतकरी बांधवांनी
पेरणी करू नये कारण कि पेरणी योग्य पावसाची शक्यता कमी आहे. शेतकरी बांधवाना विनंती करतोत कि अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये. तसेच अधिकृत माहिती आपणास वेळोवेळी कळवण्यात येईल.पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार,पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नागरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते.
Published on: 07 June 2022, 08:12 IST