Others News

मुंबई- गांजाची शेती करण्यास परवानगी मागणारे शेतकऱ्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गांजा लागवडीस कायद्याने परवानगी नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर पोलीस कारवाईत गांजा जप्तीच्या बातम्या समोर येतात. व्यसनासाठी छुप्या पद्दतीने कोट्यावधी रुपयांची गांजाची तस्करी केली जाते. जगात अनेक राष्ट्रात वैद्यकीय उपयुक्तता म्हणून गांजा लागवडीस सशर्त मान्यता देण्यात आली आहे.

Updated on 18 September, 2021 9:25 AM IST

मुंबई- गांजाची शेती करण्यास परवानगी मागणारे शेतकऱ्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गांजा लागवडीस कायद्याने परवानगी नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर पोलीस कारवाईत गांजा जप्तीच्या बातम्या समोर येतात. व्यसनासाठी छुप्या पद्दतीने कोट्यावधी रुपयांची गांजाची तस्करी केली जाते. जगात अनेक राष्ट्रात वैद्यकीय उपयुक्तता म्हणून गांजा लागवडीस सशर्त मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर पुन्हा गांजा लागवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गांजा पिकाचा इतिहास ते वैद्यकीय उपयुक्तता याविषयी जाणून घेऊया-

औषध ते तस्करी:

आयुर्वेदिक शास्त्रात गांजा वनस्पतीला औषधाचे स्थान आहे. जेव्हा सुंगणीचे अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते. तेव्हा शस्त्रक्रियेदरम्यान गांजाचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. 

गांजाच्या वैद्यकीय उपयुक्ततेपेक्षा अंमली पदार्थ म्हणून अधिक वापर केला जातो.  गांजा मध्ये मिसळण्यात येणारी तंबाखु कर्करोगाचे कारण ठरते. गांजावर कायद्याने बंदी असल्यामुळे छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. दहा हजार रुपये प्रति किलो एवढ्या प्रमाणात गांजा महाग आहे.

लागवडीच्या दृष्टीने विचार केल्यास गांजाची लागवड सहज केली जाऊ शकते. या झाडांना वाढण्यासाठी कोणत्याही औषध वा फवारणीची नव्हे तर केवळ पाण्याची गरज असते.

 

कायदा काय सांगतो?

भारतात सेवन करण्यास निषिद्ध असलेल्या अंमली पदार्थांच्या यादीत गांजाचा समावेश आहे. एनडीपीएस कायद्यानुसार गांजा बाळगणे, विक्री व सेवन करण्यास कायद्याने बंदी असून दोषी व्यक्ती कठोर शिक्षेस पात्र असते. कायद्यानुसार दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

कॅनबीज फार्मसी (cannabis pharmacy)

पाश्चिमात्य देशांत वैद्यकीय उपयुक्तता जाणून गांजा लागवडीस मान्यता आहे. औषध निर्मितीसाठी गांजाचा वापर केला जातो. जगात कॅनबीज फार्मसी मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर (shashi tharoor) यांनी लेख लिहून गांजाला कायदेशीर मान्यता देण्याच्या बाजूने मत व्यक्त केले. योगगुरू म्हणून ओळखले जाणारे बाबा रामदेव (baba ramdeo) यांच्या पतंजली उद्योग समूहाने सुद्धा आता गांजाला कायदेशीर मान्यता द्या म्हणून मागणी केली आहे.

कॅनाबिज संदर्भातील वैद्यकीय वापराला कायदेशीर आणि नियमबद्ध चौकटीमध्ये परवानगी दिलीतर भारतातल्या शेतकऱ्यांना हे नगदी पीक त्यांच्या उत्पन्नाचे आणखी एक स्रोत ठरू शकेल.

अभ्यासकांच्या मतानुसार, गांजा याविषयी समाजात असलेले गैसमज दूर होणे महत्वाचे आहे. कायद्याच्या चौकटीत गांजा लागवडीस सशर्त परवानगी मिळू शकते. गांजावर बंदी संदर्भात वाद-प्रतिवाद केले जातात. त्यामुळे जेव्हा कायदेशीर प्रक्रियेतून गांजा उत्पादनाला सशर्त परवानगी मिळाल्यानंतरच महाराष्ट्रात गांजाचे मळे फुलू शकतात.

English Summary: hemp farming in india and prohibited laws oppose hemp in india
Published on: 18 September 2021, 09:25 IST