सरकार सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. आपण पाहिले तर कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 'पीएम गरीब कल्याण योजना' सुरू केली. या योजनेतून सर्वसामान्य लोकांना मोफत रेशन दिले जात आहे.
रेशनकार्ड असलेली लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच तुम्ही आधारकार्ड वरूनही या योजनेचा लाभ घेऊ शकता. परंतु तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यास काही अडचणी येत असल्यास काळजी करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे ऑनलाईन तक्रार करून रेशनचा लाभ घेऊ शकता.
रेशन न मिळाल्यास तुम्ही वेबसाइट आणि ई-मेलद्वारे ऑनलाइन तक्रार करू शकता. तसेच तुम्ही तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर डायल करू शकता. ई-मेलद्वारे तक्रार करण्यासाठी, तुम्हाला तुमची तक्रार लिहावी लागेल. तक्रार कशी करावी? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
ई-मेलद्वारे तक्रार अशी करा -
ई-मेलद्वारे तक्रारीसाठी, cfood@nic.in वर मेल पाठवा. परंतु, हे लक्षात ठेवा की केवळ दिल्लीतील शिधापत्रिकाधारकच हा आयडी मेल करू शकतात. दिल्ली सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधेचा लाभ घेण्यासाठीच यावर तक्रार करता येईल. तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट ( http://fs.delhigovt.nic.in ) वर देखील तक्रार करू शकता.
Maharashtra Government Decision: बाजार समितीतील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार
टोल फ्री क्रमांकावर तक्रार अशी करा -
दिल्ली सरकारने रेशनकार्ड धारकांना टोल फ्री क्रमांकही दिला आहे. टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला 1800110841 वर कॉल करावा लागेल. तरीही तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या पत्त्यावर जाऊन तक्रार करू शकता.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर! 'पीओपी' लॉन्च, आता शेतमाल राज्याच्या बाहेर सहजपणे विकता येईल, वाचा माहिती
हळद आणि आले पिकांचा महत्वाचा कृषी सल्ला
Published on: 15 July 2022, 11:06 IST