Others News

केंद्र सरकार गॅस सब्सिडी ग्राहकांना देऊन त्यांच्यावरील अतिरिक्त खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते. काही वेळेस आपल्याला माहिती नाही पडत की आपल्याला सब्सिडी मिळते आहे की नाही. यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही.

Updated on 27 October, 2020 2:08 PM IST


केंद्र सरकार गॅस सब्सिडी ग्राहकांना देऊन त्यांच्यावरील अतिरिक्त खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते. काही वेळेस आपल्याला माहिती नाही पडत की आपल्याला सब्सिडी मिळते आहे की नाही. यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन गॅस सब्सिडी तपासू शकता. तुम्ही स्वतःचेक करू शकता की, सबसिडी किती आहे, कोणत्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे. या लेखामध्ये आपण याविषयीची माहिती करून घेणार आहोत. इंडियन कंपनीच्या गॅसची सब्सिडी कशी तपासायची.

महत्वाचे म्हणजे जर आपल्या वार्षिक उत्पन्नात १० लाखपेक्षा जास्त असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचा अर्थ तुम्हाला केंद्र सरकार द्वारे गॅस कनेक्शन घेतल्यानंतर त्यावर मिळणारी सब्सिडी मिळणार नाही.  पती – पत्नी या दोघांचं उत्पन्न यासाठी ग्राह धरले जाते.

   इंडियन गॅस सब्सिडी कशी तपासायची?

 इंडियन ऑइल या कंपनीचे सहाय्यक कंपनी इंडियन कंपनीची सुरुवात सन १९६५ मध्ये झाली होती. ही कंपनी कमीत-कमी ९० दशलक्ष कुटुंबांना आपली सेवा देत आहे. सरकारकडून इंडियन ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदी केल्यावर सब्सिडी मिळते. तुम्ही दोन पद्धतीने सबसिडी तपासू शकतात.  आधी म्हणजे रजिस्टर मोबाईल नंबर आणि दुसरी पद्धत म्हणजे एलपीजी आयडी. हा आयडी शोधून काढणे फार सोपे आहे. आपल्या गॅस पुस्तकावर हा आयडी दिलेला असतो. जर आपला मोबाईल नंबर कनेक्ट नसेल तर आयडीच्या माध्यमातून तुम्ही सब्सिडीचे स्टेटस चेक करू शकता.

सब्सिडी चेक करण्यासाठीच्या सोप्या ट्रिक्स

सगळ्यात अगोदर इंडियन कंपनीची ऑफिशिअल वेबसाईट https://bit.ly/35LW7H5 वर क्लिक करून मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या गुगल क्रोम ब्राउझर ओपन करावे. तुम्ही गुगलवर इंडेन सर्च करून अगोदर रिझल्टवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला सब्सिडी रिलेटेड(PAHAL) या बटणावर क्लिक करून थोड्या वेळात स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला समोर सब कॅटेगिरीमध्ये काही नवीन ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला सब्सिडी नोट रिसिवेड वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये सब्सिडी स्टेटस चेक करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले असतील. पहिला रजिस्टर मोबाईल नंबर आणि दुसरा पर्याय म्हणजे एलपीजी आयडी. जर तुमचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शनला लिंक असेल तर मोबाईल वरून करायच्या पद्धतीचा अवलंब करावा. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्या गॅस पासबुकवर दिलेला १७ अंकी एलपीजी आयडी असतो. त्याला इंटर करावे.

वरती दिलेल्या दोन्ही पर्यायापैकी एकाची निवड केल्यानंतर आय नोट अ रोबोट यावर क्लिक करावे. त्यानंतर चेक मार्क लागून जातो. त्यानंतर तुम्ही व्हेरिफाय या बटन वर क्लिक करून सोप्या पद्धतीने ही पद्धत अनुसरू शकता. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावे. आता तुमच्यासमोर आजपर्यंतच्या सगळ्या डाटा उपलब्ध होईल जसे की, तुम्ही सिलेंडर कधी बुक केले आणि त्याची किती सब्सिडी मिळाली आणि कोणत्या बँक अकाउंटमध्ये पाठवले आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. नाहीतर एक उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही कस्टमर केअरला संपर्क साधून सब्सिडीविषयी माहिती मिळवू शकता. कस्टमर सर्विस एजंट तुम्हाला फक्त रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी विचारतील. इंडियन गॅस कस्टमर केअर नंबर-18002333555

English Summary: Has the gas connection subsidy stopped? Check your Indian Gas subsidy like this
Published on: 27 October 2020, 02:07 IST