सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचले असल्याने यावर असणारे वाहन चालवणे मुश्कील झाले आहे.अक्षरशा बाईक चालवणे मुश्कील झाले आहे. त्यातच आता सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेन्ड बाजारांमध्ये येत असल्याने विविध प्रकारच्या कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक बाईक्स बाजारात आणत आहेत.
त्यामध्येच एक अतिशय इलेक्ट्रिक स्कूटर च्या बाबतीत दिलासादायक बातमी समोर आली आहे.ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्सने ग्रेटा ग्लाईड नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च झालेली आहे.या स्कूटर ची किंमत अन्य सामान्य स्कूटर प्रमाणे आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदाही फुल चार्ज केली तर शंभर किमी पर्यंतरेंज येते.ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटरणे या कंपनीनेबुकिंग सुरू केले आहे व सोबतच ग्राहक बाय नाऊऑफर्सचादेखील लाभ घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत फ्री बुक केलेल्या स्कूटरवर सहा हजार रुपयांची सूट आणि स्पॉट बुक केलेल्या स्कूटरवर दोन हजार रुपयांची सूट दिली जात आहे.ही स्कूटरयलो, ग्रे,ऑरेंज, स्कार्लेट रेड,रोज गोल्ड, कॅण्डी व्हाईट इत्यादी सात रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच कंपनी तीन वर्षाची बॅटरी वारंटी देखील देत आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये
ही इलेक्ट्रिक स्कूटर बऱ्याच परफॉर्मन्स आणि सेफ्टी फीचर्ससोबत येते. यामध्ये डी आर एल,ईबीएस, ए टी ए सिस्टम आणि स्मार्ट शिफ्ट चा समावेश आहे. स्कूटर्स रिव्हर्स ड्राईव्ह मोड आणि थ्री स्पीड ड्राईव्ह मोडला देखील सपोर्ट करते.याशिवाय या स्कूटरमध्ये साडेतीन इंचाचे रुंद ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. तसेच एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले,किलेस स्टार्ट, अंती थिफ्ट अलर्म, लाईट डिझायनर कन्सोल,फ्रंट ग्लोव्ह बॉक्स त्यासोबतच एक्स्ट्रा लार्ज लेग रूम यांचा समावेश आहे.
सोबतच फाइंड माय वेहिकल अलार्म,ब्लॅक लेदर सीट कवर आणि यूएसबी पोर्ट देखील देण्यात आले असून या स्कूटर ची किंमत 80 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Published on: 05 March 2022, 07:54 IST