सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे पेव फुटले असून बर्याच जणांच्या कल हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून भडकलेल्या इंधनाच्या किमती यामुळे वाहनांचा वापर करणे खिशाला परवडणा-या जोगे राहिले नाही.
त्यामुळे बरेच जण सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना दिसत आहेत. तसे पाहायला गेले तर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील एक महत्त्वाचे ठरू शकते. तसेच केंद्र सरकारचा प्रयत्न देखील याकडेच दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, ज्या कुणाला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे असेल अशा व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक वाहन खरेदी वर आकर्षक योजना आणली असून या योजनेचे नाव आहे ग्रीन कार कर्ज योजना हे होय.
एसबीआयची खास ऑफर
इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्रीन कार्ड कर्ज योजना आणली असून या योजनेच्या अंतर्गत घेतलेल्या वाहन कर्जाच्या व्याजदरावर चक्क 0.20 टक्के सूट दिली जात असून या प्रकारच्या कर्जावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क देखील भरावे लागणार नाही.
या योजनेअंतर्गत ई वाहन खरेदीवर घेतलेल्या कर्ज हे 0.20 टक्के व्याजदराने उपलब्ध असून ते तुम्हाला आठ वर्षाच्या आत फेडायचे आहे.एसबीआयच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय कार कर्जावरील व्याजदर हा 7.25 टक्के ते 7.60 टक्क्यांपर्यंत आहे. परंतु तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्ही वाहनाच्या ऑन रोड किमतीच्या शंभर टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकतात व तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही.
नक्की वाचा:Business Idea: नोकरीं विसरा अन SBI सोबत काम करा, महिन्याला मिळणार 60 हजार, वाचा सविस्तर
इलेक्ट्रिक वाहनांवरील कर सवलतीचा लाभ देखील घेता येऊ शकतो
एखाद्या व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना घसारा आणि वाहन घेतल्यावर कर्जावरील व्याज आवर आयकरात सूट मिळते. परंतु पगारदार करदात्यांना ही सुविधा मिळत नाही.
परंतु इलेक्ट्रिक वाहनांचा बाबतीत यामध्ये फरक असून सरकार यासाठी प्रोत्साहन देत आहे. म्हणजे तुम्ही जर इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले असेल तर तुम्हाला आयकर कलम 80EEVअंतर्गत त्यावर भरलेले व्याज कमाल दीड लाखांपर्यंत कापले जाईल.या कपातीचा दावा करण्यासाठी एक अट अशी आहे की कर्ज बँक किंवा एनबीएफसी कडून असावे आणि कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 दरम्यान मंजूर केलेले असावे.
नक्की वाचा:आता घरबसल्या मिळवा 35 लाखांपर्यंत कर्ज, SBI बँकेची एकदम ऑफर सुरू, जाणून घ्या सविस्तर
Published on: 12 June 2022, 12:11 IST