भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात एक नावाजलेली कंपनी म्हणून हीरो मोटोकॉर्प विख्यात आहे. या कंपनीची हीरो स्प्लेंडर प्लस ही देशात सर्वात जास्त विक्री होणारी बाईक आहे. ही बाईक मध्यमवर्गीय लोकांच्या पसंतीस विशेष खरी उतरली आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे या बाईकचे दमदार मायलेज आणि शानदार लूक. आज आपण हिरो स्प्लेंडर या गाडीवर मिळत असलेल्या जबरदस्त फायनान्स प्लॅनविषयी चर्चा करणार आहोत.
Hero Splendor Plus Self Start i3s वैरिएंट या मॉडेलची सुरवाती एक्स शोरूम किंमत 70 हजार 790 रुपये एवढी कंपनीने ठेवली आहे.
हिरो स्प्लेंडर प्लस या बाईकचे फीचर्स
हिरो कंपनीच्या हिरो स्प्लेंडर प्लस या बाईक मध्ये 97.2 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 8.2 पीएच पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे तसेच हे इंजिन 8.02 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीची ब्रेकिंग सिस्टम देखील खूपच उत्तम आहे पुढे आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
या गाडीला एलोय व्हील तसेच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. कंपनीच्या मते ही गाडी 80 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.
जाणुन घेऊया फायनान्स ऑफरविषयी
ईएमआय कॅल्क्युलेटर नुसार, हिरो स्प्लेंडर प्लस बाइक केवळ आठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरून देखील आता विकत घेता येऊ शकणार आहे.
अर्थात, बँकेद्वारे या गाडीसाठी जवळपास 73 हजार रुपये लोन मिळू शकणार आहे. या लोन साठी बँकेद्वारे 9.7 टक्के व्याजदराने व्याज घेतले जाणार आहे. आठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर आपणास 2343 रुपयाचा मासिक हप्ता तीन वर्षापर्यंत भरावा लागणार आहे.
Published on: 11 March 2022, 10:59 IST