आजच्या काळात गाई-म्हशींच्या शेणाला जास्त मागणी आहे. कारण शेनापासून अनेक प्रकारचे उत्कृष्ट पदार्थ तयार केले जातात.ज्यांची देश-विदेशातील बाजारपेठेत किंमत जास्त आहे.जर तुमच्याकडेही गाय म्हशी असतील तर त्यांचा शेणाचा वापर करूनतुम्ही चांगला व्यवसाय स्थापन करू शकतात.या लेखात आपण शेनापासून कोणकोणते व्यवसाय करता येतात याची माहिती घेऊ.
शेणाचा वापर करून करता येण्याजोगे व्यवसाय
1- शेना पासून कागद बनवण्याचा व्यवसाय-पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारकडूनही प्लांट उभारण्यात येत आहे.ज्यामध्ये पशुपालक गाई-म्हशींच्या शेणाचावापर करून सहजपणे कागद तयार करू शकतात.
हा प्लांट देशातील प्रत्येक गावात लावला जाईल. तसे पाहिले तर या प्रकल्पाचे काम बहुतांश गावांमध्ये सुरू झाले असून यामध्ये पशुपालकांना शेणाच्या बदल्यात चांगले पैसे दिले जाणार असून शेणाच्या या प्लांट च्या मदतीने लोकांना चांगला रोजगार देखील मिळणार आहे.
2- शेणाच्या मूर्तीचा व्यवसाय-प्रत्येकाला शिल्पकला आवडते.बाजारात मूर्तींची किंमतही अधिक असते. तुम्हाला देखील या माध्यमातून जास्त नफा मिळवायचा असेल तर कमी खर्चात तुम्ही शेनापासून मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. मेक इन इंडिया, क्लीन आणि ग्रीन इंडिया अंतर्गत गायीच्या शेनापासून मूर्ती तयार करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
3- शेणाच्या गोवऱ्याचा व्यवसाय- आपल्याला माहिती आहे की, शेणाच्या गोवऱ्या यांचा वापर पूजा आणि अनेक धार्मिककार्यक्रमात केला जातो.अशा परिस्थितीत शेणाच्या गोवऱ्या यांचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.आजच्या डिजिटल युगात लोक आपला हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करत आहेत.त्यामुळे तुम्ही शेणाच्या गोवऱ्या ऑनलाइन पद्धतीने देखील विकू शकता यासाठी अनेक ऑनलाइन कंपन्या चांगल्या किमतीत गोवऱ्याखरेदी करतात.
4- शेनापासून सीएनजी प्लांटचा व्यवसाय-जर तुम्ही पशुपालक असाल आणि तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल,तर तुम्ही शेनापासूनबनवलेला सीएनजी प्लांट लावून चांगला नफा मिळवू शकता.प्लांट उभारण्यासाठी तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत ही मिळू शकते. तुम्ही बायो सीएनजी केवळ शेणापासूनच नाही तर इतर प्राण्यांच्या शेनापासून आणि कुजलेल्या भाज्या आणि फळापासून देखील बनवू शकतात. सीएनजी प्लांट उभारण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र मशीन बसवावे लागतील, त्यांची किंमत बाजारात जास्त आहे परंतु एकदा हा व्यवसाय सुरू झाला की, तुम्ही कमी वेळेत जास्त नफा मिळू शकतात.
नक्की वाचा:खत विक्रीबाबत मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय; शेतकऱ्यांचा होणार फायदा
Published on: 04 June 2022, 06:23 IST