Others News

मुलगी म्हटली म्हणजे घरची लक्ष्मी असे म्हटले जाते.मुलगी नको ही जी समाजामध्ये एक मानसिक अवस्था होती ती आता हद्दपार होत आहे.

Updated on 06 April, 2022 10:01 AM IST

मुलगी म्हटली म्हणजे घरची लक्ष्मी असे म्हटले जाते.मुलगी नको ही जी समाजामध्ये एक मानसिक अवस्था होती ती आता हद्दपार होत आहे.

जर मुलींविषयी विचार केला तर असं एकही क्षेत्र नाही जेथे लेकी या पुढे नाहीत. अगदी पायलट, संरक्षण विभाग, आय ए एस, आयपीएस कुठलेही क्षेत्र  असो त्यामध्ये मुली प्रथम क्रमांकावर आहेत. अशा मुलीचा  घरात जन्म झाला तर किती आनंद होऊ शकतो याचे प्रत्यंतर   नुकतेच खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्मानंतर पाहायला मिळाला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे जन्मलेल्या मुलीचे विचार सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने स्वागत करण्यात आले. या गावातील झरेकर कुटुंबीयांनी मुलगी हेच आपल्या वंशाचा दिवा आहे, असे समजून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करत  गावातीलच नाही तर परिसरातील सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

नक्की वाचा:माहिती शेतकऱ्यांच्या कामाची! माहिती करून घ्या शेत जमीन धारकांचे प्रकार

मुलीच्या जन्मानंतर घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर

 झरेकर कुटुंबांमध्ये जन्मलेल्या या मुलीचे नाव राजलक्ष्मी असून तिचा जन्म 22 जानेवारी रोजी भोसरी इथे तिच्या आईच्या घरी झाला. परंतु लेकीला स्वतःच्या घरी आणण्यासाठी वडिलांनी चक्क हेलिकॉप्टर मागवले. त्या बाळाच्या वडिलांचे नाव विशाल झरेकर असून ते व्यवसायाने वकील आहेत. याबाबत त्यांनी सांगितले की आमच्या पूर्ण कुटुंबात एक ही मुलगी नव्हती. त्यामुळे आमच्या घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर आम्ही तिच्या स्वागतासाठी एक लाख रुपयांचा चॉपर राईड ची व्यवस्था केली आहे. मुलीला तिच्या घरी हेलिकॉप्टरमधून आणण्यात आल.

नक्की वाचा:प्रेरणादायी! सपाटा शिमला मिरची देत आहे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक दिशा, येथील शेतकरी कमवीत आहेत चांगला नफा

 पुढे त्यांनी सांगितले की घरामध्ये खुप दिवसांनी एखादा मुलींने जन्म घेतला त्यामुळे आमच्या घरात सगळा आनंदी वातावरण असून म्हणून मी आणि माझी पत्नी आणि लेक राजलक्ष्मीला दोन एप्रिलला हेलिकॉप्टरने घरी आणले. 

यासाठी त्यांनी जेजुरी येथे देवाचे दर्शन घेतले. परंतु या ठिकाणी जाण्यास परवानगी नसल्याने आम्ही आकाशातुन प्रार्थना केली असे विशाल झरेकर यांनी सांगितले. मुलीच्या घरात प्रवेश झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आई आणि लहान बाळाचे जंगी स्वागत करण्यात आले.(स्रोत-ABP माझा)

English Summary: grand welcome to baby girl after born by entry at home by helicopter
Published on: 06 April 2022, 10:01 IST