नवी दिल्ली : केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात दुर्बल आणि गरीब लोकांसाठी गरीब कल्याण योजना सुरू केली होती. ज्यामध्ये गरीब कुटुंबांना 10 किलो धान्य मोफत दिले जाते.
रेशनकार्डवर मोफत मिळणारा गहू चार महिने मिळणार नाही. म्हणजेच जून ते सप्टेंबरपर्यंत लोकांना रेशनकार्डवर मोफत गहू घेता येणार नाही. याचे कारण असे की, यावेळी सरकारने गव्हाची खरेदी कमी केली आहे.
कार्डधारकांना महिन्यातून दोनदा रेशन मिळते. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महिन्याच्या १५ तारखेनंतर रेशनचे वाटप केले जाते.
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये होणार 'इतकी' वाढ
या लोकांना रेशन मिळणार नाही
हे रेशनही केवळ पात्र कुटुंबांनाच देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अपात्र लोकांना कार्ड जमा करण्यास सांगितले आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना दंड भरावा लागू शकतो.
DSO कडून माहिती देण्यात आली आहे की, ज्यांच्याकडे 100 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त प्लॉट, फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, खेड्यांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वार्षिक तीन लाखांपेक्षा जास्त कुटुंबाचे उत्पन्न आहे. तुमचे रेशन कार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
Published on: 12 May 2022, 04:58 IST