Others News

आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, काही दिवसांपासून शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत काय घोळ चालले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पवित्र पोर्टल व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग भारतात एमपीएससी परीक्षेच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून आता शासनाला सादर करण्यात आला आहे.

Updated on 16 August, 2022 2:56 PM IST

 आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, काही दिवसांपासून शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत काय घोळ चालले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पवित्र पोर्टल व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग भारतात एमपीएससी परीक्षेच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून आता शासनाला सादर करण्यात आला आहे.

यासाठी काही तांत्रिक बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नक्की वाचा:सुवर्णसंधी! तुम्ही 'आयटीआय' पास असाल तर तुमच्यासाठी आहे बंपर भरतीची संधी,वाचा सविस्तर माहिती

आपल्याला माहित असेलच की, सन 2012 पासून राज्यामध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आल्यामुळे राज्यात सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची बहुतेक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे बरेच युवकांची  मागणी होती की राज्यात शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यात यावी.

शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अगदी पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले परंतु  या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच टेक्निकली अडचण आल्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यावर उपाय म्हणून खाजगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची जी काही पदे आहेत ती पदे मुलाखतीच्या माध्यमातून भरण्याचा टप्पा सुरू आहे.

नक्की वाचा:PNB बँकेत या पदांसाठी बंपर भरती! पदवी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीच्या माध्यमातून शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवावी याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात आला व या प्रस्तावाला शिक्षण सचिव व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला आहे.

यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्याचे काम सुरू असून तोपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण होईल व मात्र यापुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

नक्की वाचा:महत्वाचे:9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार दरवर्षी देणार 1.25 लाख रुपये शिष्यवृत्ती,वाचा महत्त्वाची माहिती

English Summary: government take decision about teacher recruitment by mpsc
Published on: 16 August 2022, 02:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)