Others News

देशातील अनेक राज्यात मॉन्सून वेळेआधी पोहोचला आहे. मॉन्सून पोहोचताच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरु झाली आहेत. दरम्यान सरकारकडून खरीप पिकांच्या विम्यासाठी (Crop Insurance) ट्विटरवर एक सुचना देखील दिली आहे.

Updated on 23 June, 2020 2:56 PM IST


देशातील अनेक राज्यात मॉन्सून वेळेआधी पोहोचला आहे. मॉन्सून पोहोचताच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरु झाली आहेत. दरम्यान सरकारकडून खरीप पिकांच्या विम्यासाठी (Crop Insurance) ट्विटरवर एक सुचना देखील दिली आहे. दरम्यान विमा योजना ही ऐच्छिक आहे. पिकांना नैसर्गिक संकटापासून वाचवाण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) सुरू केली होती. ही योजना १३ जानेवारी २०१६ रोजी सुरू करण्यात आली होती. भारतीय कृषी विमा कंपनी AIC या योजनेला राबवत आहे.

सरकारकडून कृषी विभागाने आपल्या ट्विट संदेश पाठवला आहे. कृषी विभागाने आपल्या या संदेशात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती, संकटापासून सुरक्षा मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा करावा.  बहुतांश राज्यात खरीप २०२० साठी विमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा (Pradhan mantri Fasal Bima Yojana) लाभ घ्यायचा असेल तर ३१ जुलै २०२० च्या आधी बँक शाखेत याची नोंद करून घ्यावी. जर आपण शेतकरी आहात आणि तुम्ही पीक विमा करु इच्छित आहात तर यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची गरज लागेल. यात शेतकऱ्याचे ओळखपत्र, यात आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, आदी.

या योजनेसाठी किती द्यावा लागतो हप्ता 

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी खरीप पिकांसाठी २ टक्के हप्ता आणि रब्बीसाठी १.५ टक्के हप्ता भरावा लागतो. दरम्यान यात शेतकऱ्यांना ५ टक्के हप्ता भरावा लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे. तर त्यांचे पीक आपोआपच विम्याच्या अंतर्गत येत असतात. तर बाकी शेतकरी आपल्या इच्छेने पीक विमा उतरवू शकतात. जन सेवा केंद्रात (Common Services Centres) वरही पीक विमा केला जातो.

English Summary: government send notice on twitter regarding crop insurance
Published on: 23 June 2020, 02:55 IST