Others News

पीएम किसान सन्मान योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात १० -१० हजार रुपये टाकणार आहे. सरकार या योजनेचा पाचवा हप्ता लाभार्थ्यांना पाठवला आहे. दरम्यान या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते.

Updated on 22 July, 2020 6:10 PM IST


पीएम किसान सन्मान योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात १० -१० हजार रुपये टाकणार आहे. सरकार या योजनेचा पाचवा हप्ता लाभार्थ्यांना पाठवला आहे. दरम्यान या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. वर्षाला ६ रुपयांचे मदत सरकारकडून केली जाते. दरम्यान आपल्याला या योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर आपण आपला अर्ज परत एकदा तपासून पाहावा. बऱ्याच वेळेस अर्ज करताना चुका होत असतात.

कधी - कधी आधार कार्ड आणि अर्जावरील नावात फरक असतो. त्यामुळे आपण पुर्तता केलेल्या कागदपत्राची तपासणी करावी. जर आपण आपल्या चुका दुरुस्त केल्या नसतील तर पुढील महिन्यात येणारा हप्ता हा येणार नाही. यअर्ज करताना अर्जदाराचा आधार क्रमांक आणि खातेक्रमांक व्यस्थीत टाकावा. बऱ्याच वेळेच या नंबरमध्ये चुका होत असतात.

अशा पद्धतीने दुरुस्त करा चुका
PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळ (https://pmkisan.gov.in/) यावर जा. येथे फार्मर कॉर्नरच्या आत जाऊन Edit Aadhaar Details या पर्ययावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर नोंदवा. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. आता जर आपले नाव चुकीचे असेल तर ते ठीक करा. जर अजून काही दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभगाशी संपर्क करावा. जर यानंतरही आपल्या खात्यात पैसे आले नाही तर आपण केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा आणि आपली तक्रार नोंदवा. या नंबर आपली तक्रार ऐकली गेली नसेल तर आपण मंत्रालयाच्या (011-23381092) नंबरवर संपर्क साधावा.

English Summary: government send 10 - 10 thousand ruppes to farmers account under Pm kisan scheme
Published on: 22 July 2020, 06:09 IST