Others News

कोरोना व्हायरसने देशात मोठं थैमान घातले आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातातील काम गेलं आहे. लोकांच्या हातातील रोकड संपत आली आहे. याचदरम्यान सरकारने मुलींना कोरडपती बनवणाऱ्या सुकन्या समुद्धी योजनेत बदल केला आहे.

Updated on 07 July, 2020 3:53 PM IST


कोरोना व्हायरसने देशात मोठं थैमान घातले आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातातील काम गेलं आहे. लोकांच्या हातातील रोकड संपत आली आहे. याचदरम्यान सरकारने मुलींना कोरडपती बनवणाऱ्या सुकन्या समुद्धी योजनेत बदल केला आहे. नवीन खाते उघडण्याच्या काही नियमात सूट देण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या नव्या मार्गदर्शक नियमांनुसार सुकन्या समुद्धी योजनेतील खाते ३१ जुलै २०२० ला किंवा त्याआधी मुलीच्या नावा उघडण्यात येतील ज्या मुलींचे वय २५ मार्च २०२० ते ३० जून २०२० पर्यंत लॉकडाऊनच्या काळात १० वर्ष पुर्ण झडाली आहेत. त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, ज्या कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनच्या कारणांमुळे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकले नाहीत.

या योजनेतून किती मिळते व्याज

सुकन्या समुद्धी योजनेतून सध्या ७.६ टक्के व्याज मिळत आहे. योजनेत खाते उघडताना व्याजदर असतो, त्याच प्रमाणे आपल्या गुंतवणूकीवर व्याज आकारला जातो. सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यासह सर्व अल्प बचत योजनेतील गुंतवणुकीवर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या व्याजदरात बदल केला नाही.

किती गुंतवणूक करु शकतो -  अर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतो.

एका आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रुपये जमा करावे लागतात. एका वर्षात दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. खाते सुरु ठेवण्यासाठी  कमीत कमी २५० रुपये जमा करावे लागतील.

आयकरातून मिळते सूट

सुकन्या समुद्धी योजनेतून गुंतवणूक केल्यास आपल्याला आयकरपासून सुटका मिळते.  योजनेतील वर्षाला १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीत आपल्याला आयकरातून सुटका मिळते.  योजनेतील व्याज आणि मुदल रक्कम पण टॅक्स फ्री असते.

पात्रता  - नियामानुसार, १८ वर्षाच्या मुली आपले खाते सुरु करु शकतात. याआधी वयाची पात्रता ही १० वर्ष होती.  जेव्हा मुलगी १८ वर्षाची होईल तेव्हा पालकांना मुलीचे कागदपत्र पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागतील.  दोन मुलींपेक्षा जास्त मुलींचे खाते उघडत असताना अधिक कागदपत्रांची गरज लागेस.  नव्या नियमानुसार दोन पेक्षा अधिक मुलींचे खाते उघडायचे असेल तर  जन्म तारखेसह एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.

 

English Summary: government change in sukanya samriddhi scheme ; New beneficiaries get benefit
Published on: 07 July 2020, 03:52 IST