Others News

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीर, लड्डाखमधील शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर ठरणार आहे.

Updated on 24 April, 2020 6:16 PM IST


कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे.  मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीर, लड्डाखमधील शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर ठरणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या माहितीसोबत आधार नंबर  देणे आवश्यक नसणार आहे.  सरकारने आधार नंबर जोडण्याची मुदत एक वर्षाने वाढवली आहे.  म्हणजेच शेतकऱ्यांना आधार जोडणीची मुदत मार्च २०२१ पर्यंतची मुदत सरकारने दिली आहे.  हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळात घेण्यात आला.

काय आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते.  साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.  यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते.

कशाप्रकारे मिळणार योजनेचा पैसा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

पीएम - किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र

आपली नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाचा माहिती वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे.

English Summary: goverment change in pm kisan scheme; this states farmer's will get benefits
Published on: 24 April 2020, 06:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)