Others News

आज सगळ्या ठिकाणी ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी गुगल पे चा वापर केला जातो. तुम्ही पण Google pay वापरात असताल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही गुगल पेद्वारे फक्त एका क्लिकवर 1 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता.

Updated on 21 February, 2022 3:13 PM IST

आज सगळ्या ठिकाणी ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी गुगल पे चा वापर केला जातो. तुम्ही पण Google pay वापरात असताल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही गुगल पेद्वारे फक्त एका क्लिकवर 1 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्ही Google Pay अ‍ॅपद्वारे 10 मिनिटांत कर्ज मिळवू शकता.

गुगल पे ने DMI Finance Limited (DMI) सोबत हातमिळवणी करून पर्सनल लोनची ही सुविधा सुरू केली आहे. ही एक अतिशय सोपी आणि झटपट (Digital Personal Loan) कर्ज मिळून देणारी सुविधा आहे. Google Pay आणि DMI Finance Limited कडून ग्राहक सहजपणे या Instant Personal Loan चा लाभ घेऊ शकतात.

तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असल्यास, तुम्हाला काही मिनिटांत 1 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळेल. म्हणजेच आता गुगल पे वर रुपयांचे व्यवहार आणि बिल भरण्यासोबतच वैयक्तिक कर्जाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा : International Mother Language Day: आज जागतिक मातृभाषा दिन; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांसाठीच ठरली फायद्याची; धक्कादायक माहिती आली समोर

असा करा अर्ज

१. लोन मिळवण्यासाठी सर्वात आधी गॉगल पे अ‍ॅप ओपन करा.
२. Promotions च्या खाली Money चा ऑप्शन दिसेल तो ओपन करा.
३. Loan ऑप्शनवर क्लिक करा.
४. तुम्हाला DMI ऑप्शन दिसले, त्यावर क्लिक करा.
५. तुम्ही किती रुपयांचे लोन घेऊ शकता याचे ऑफर्स दिसेल.
६. तुम्हाला तुमचे Application प्रोसेस करायचे आहे.
७. यानंतर तुमचे लोन Approve होईल आणि तुमच्या खात्यात झटपट पैसे ट्रान्सफर केले जातील.

हे ही वाचा : जिल्ह्यात 11 साखर कारखाने सुरु असताना शेतकऱ्यांचा ऊस फडातच; वजनात मोठी घट 

सर्वच गुगल पे वापरकर्त्यांना या पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुमच्या उर्वरित कागदपत्रांनुसार तुम्हाला Google Pay द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाईल. जर तुम्ही याचे प्री-अप्रूव्ह ग्राहक (Pre Approved Customer) असाल, तर तुम्हाला लवकरच लोनची प्रक्रिया केल्यानंतर त्वरित कर्ज (Instant Loan Offer) दिले जाईल.

English Summary: Google pay Loan
Published on: 21 February 2022, 03:13 IST