देशातील तमाम छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर आपण किराणा दुकान अथवा तत्सम छोटा-मोठा व्यवसाय करत असाल तर आपणास पेटीएम पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. पेटीएम द्वारे देण्यात येणाऱ्या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, हे कर्ज विनातारण तसेच स्वस्त व्याज दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. पेटीएम हे कर्ज त्वरित पात्र लाभार्थ्यांना देऊ करणार आहे, पेटीएमने यासाठी शेड्यूल्ड कमर्शियल बँक आणि एनबीएफसी सोबत पार्टनरशिप देखील केली आहे.
पेटीएम द्वारे देण्यात येणाऱ्या या कर्जावर कंपनीने दररोज ईएमआय देण्याचा विकल्प देखील खुला केला आहे. याचा अर्थ असा की, जे छोटे उद्योजक अथवा व्यवसायिक या कर्जाचा लाभ घेतील त्यांना रोजाना ईएमआय देण्याचा विकल्प उपलब्ध करून दिला जाणार आहे. पेटीएम फॉर बिजनेस ॲपच्या Merchant Lending Program अन्वये कर्ज घेतले जाऊ शकणार आहे. पेटीएम चा अल्गोरिदम कुठल्या लोकांना कर्ज द्यायचे हे ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे. पेटीएम वर करण्यात आलेल्या व्यवहारावरून लोन साठी पात्र व्यक्तींची निवड केली जाणार असल्याचे समजत आहे.
जर आपणास पेटीएम अंतर्गत लोन प्राप्त करायचे असेल तर आपणास यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. कर्ज भेटल्यानंतर याची परतफेड देखील ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी कुठल्याच प्रकारचे अतिरिक्त कागदपत्र कंपनीद्वारे मागितले जाणार नाही.
कर्जासाठी या पद्धतीने करा अर्ज
•जर आपणास पेटीएम द्वारे कर्ज प्राप्त करायचे असेल तर Paytm for Business या अँप्लिकेशनवरील होम स्क्रीनवर 'बिझनेस लोन' हा आयकॉन दिसेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी उपलब्ध ऑफर दिसू लागतील. आपण आपल्या गरजेनुसार कर्जाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.
•एकदा तुम्ही रक्कम निवडल्यानंतर, तुम्ही कर्जाची रक्कम, वितरण, एकूण देय, दैनिक हप्ता, कार्यकाळ इत्यादी तपशील पाहण्यास सक्षम असाल.
•तुमच्या तपशीलांची पुष्टी करा, चेक बॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जाण्यासाठी 'प्रारंभ करा' वर टॅप करा. तुमचा कर्ज अर्ज जलद पूर्ण करण्यासाठी CKYC कडून तुमचे KYC तपशील मिळवण्यासाठी तुम्ही तुमची संमती देखील देऊ शकता.
•पुढील स्क्रीनवर, तुम्ही तुमचा पॅन कार्ड डेटा, जन्मतारीख आणि ई-मेल पत्ता यासारख्या माहितीची पुष्टी करू शकता किंवा भरू शकता. एकदा पूर्ण झाल्यावर, तुम्ही ऑफर पुष्टीकरणासह पुढे जाऊ शकता. पॅन तपशीलांची पडताळणी झाल्यानंतर, तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जाईल आणि केवायसी तपशीलांची पडताळणी केली जाईल.
•तुमचा कर्जसाठी आवश्यक अर्ज सबमिट केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात वितरित केली जाईल. कृपया शेवटचे सबमिशन करण्यापूर्वी सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करा
Published on: 18 February 2022, 11:19 IST