वीजजोडणी देणाऱ्या कंपनीकडून ग्राहक वीज जोडणी घेऊन विजेच्या वापराचे पैसे भरत असतो. राज्यात देशात अशा अनेक वीज कंपन्या आहेत, ज्या राज्यात, देशामध्ये वीज जोडणी देतात. जर तुम्हाला अशा कंपनीपासून इतर गोष्टींपासून त्रास होत असेल आणि जर तुम्हाला ती कंपनी नको असेल तर ग्राहकांना आता आपल्या सध्याच्या वीज कंपनीकडून सुटका करून घेता येणार आहे. याशिवाय तुम्हाला जर नवी वीज जोडणी घ्यायची असेल तर तुम्हाला तशी दुसरी कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मिळू शकणार आहे,
नवीन दुसरी कंपनीशी कनेक्शन करुन घेण्यासाठी ग्राहकांना एकच नाही तर एकापेक्षा जास्त वीज जोडणी देणाऱ्या वीज कंपन्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची तरतूद असणारे वीज सुधारणा विधेयक 2022 संसदेच्या जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शेतीतून अधिक उत्पन्न येण्यासाठी अशी करावी शेतीची पूर्व तयारी
भारतीय व्यापार आणि वाणिज्य महासंघाच्या वतीने फिक्की (FICCI) आयोजित केलेल्या ‘इंडिया एनर्जी ट्रान्समिशन समिट 2022’ मध्ये देशाचे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी महत्वाची माहिती दिली. “नव्या वीज कायद्यासाठी आम्ही सर्व जण संबंधित मंत्रालये, संबंधित घटक सज्ज आहोत. पावसाळी अधिवेशनात आम्ही ते मांडू शकू”, असेही ते म्हणाले.
भारतात ग्रीन हायड्रोजनचा वापर, येत्या काळात सर्व वाहने विजेवर आणि सर्व उद्योग पर्यावरणपूरक ऊर्जेवर चालविण्याचे ध्येय 2030 पर्यंत देशात 700 गिगावॉट अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे, असे सांगून त्यासाठी प्रोत्साहनपर लाभांश देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Published on: 21 June 2022, 10:49 IST