Others News

पोस्ट ऑफिस योजनेच्या गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता ग्राहक घरी बसून पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकणार आहेत.

Updated on 05 September, 2022 1:19 PM IST

पोस्ट ऑफिस योजनेच्या गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता ग्राहक घरी बसून पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक (invest) करून चांगला नफा मिळवू शकणार आहेत.

भारतीय पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP) यांसारख्या योजनांवर ऑनलाइन सेवा देणे सुरू केले आहे.

पोस्ट ऑफिसने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हंटले आहे की, पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंगद्वारे ग्राहकांना किसान विकास पत्र (KVP) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या सुविधांचा सहज लाभ घेता येईल.

आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय

सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.8 टक्के परतावा मिळत आहे, जो बहुतांश बँक एफडीपेक्षा खूप जास्त आहे. तुम्हाला या योजनेत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिसची (post office) इंटरनेट बँकिंग सुविधा घ्यावी लागेल.

यानंतर तुम्ही घरबसल्या सहजपणे त्याच्या खात्याचा आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही 5 वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकता.

दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर

किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्र (kisan vikas patra) ही एक बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही 124 महिन्यांसाठी पैसे गुंतवू शकता. या काळात तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. या योजनेत तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळते.

गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सेवा घेतल्यावर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत सहज पैसे गुंतवू शकता. या योजनेत किमान 1,000 आणि कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो.

महत्वाच्या बातम्या 
जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा
रिस्क घ्या, चांगला नफा नक्की होईल; जाणून घ्या राशीभविष्यनुसार बिझनेस
गौरी विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त

English Summary: Good news Invest post office scheme
Published on: 05 September 2022, 01:14 IST