पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेली घर बांधणी अग्रिम योजना अनेक दिवसांपासून बंद होती.देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडी सरकार बदलणार असून ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे
देवेंद्र फडणवीस सरकारने सन 2017 मध्ये घर बांधणी अग्रिम योजना बंद करून ही योजना खासगी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेकडे वर्ग केली होती.परंतु आता यामध्ये राज्यशासन बदल करणार असून राज्य सरकार घर बांधणी अग्रिम योजनेच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांनापैसे देणार आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पोलीस कर्मचाऱ्यांना मधून स्वागत केले जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा हा पोलीस कर्मचाऱ्यांना होणार असून त्यांना आता बँकांकडे कर्ज मागण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही.
या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारची वर्षाला 36 कोटी रुपये वाचणार आहेत. कारण राज्य सरकारला अधिकचे36 कोटी रुपये बँकांना देण्यासाठी मोजावे लागत होते.त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण देखील कमी होणार आहे.
Published on: 17 January 2022, 09:17 IST