पीएफ खातेधारकांना यंदा मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कारण EPFO बोर्डाने अलीकडेच 2021-22 आर्थिक वर्षासाठी EPFO व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणल्याने पीएफ खातेदारांत नाराजी पसरली होती. आता हा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.EPFO आता आपल्या गुंतवणूकदारांसाठी जास्त लाभ देता यावा यासाठी एक योजना आखत असल्याची माहीती आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, EPFO आता शेअर बाजारात आपली गुंतवणूक मर्यादा वाढवण्याबाबत विचार करत आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून EPFO खातेधारकांना अधिक व्याज मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FAIC ने केलेल्या शिफारसीवर विचार करण्यासाठी आणि अंतिम निर्णय CBT घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय श्रम मंत्री यांच्या अध्यक्षेखाली असणाऱ्या CBT EPFO इक्विटी किंवा इक्विटी-संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यायोग्य ठेवींपैकी 5 ते 15 टक्के असणारी गुंतवणूक मर्यादा 20 टक्के करण्यास मंजुरी देऊ शकते.
29 आणि 30 जुलै रोजी होणा-या EPFO विश्वस्तांच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे आणि हा प्रस्ताव मंजूर केला जाईल, अशी माहीती आहे.श्रम आणि रोजगार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नास लेखी उत्तर दिले. त्यात असं म्हटलं आहे की, शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याची शिफारस FIAC ने केली असल्याचे सांगितले होते. EPFO च्या इक्विटीबाबत गुंतवणुकीवर वर्ष 2021 मध्ये 16.27 टक्के रिटर्न मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष 2020-21 मध्ये 14.67 टक्के परतावा मिळाला होता, असं सांगण्यात आलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FAIC ने केलेल्या शिफारसीवर विचार करण्यासाठी आणि अंतिम निर्णय CBT घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय श्रम मंत्री यांच्या अध्यक्षेखाली असणाऱ्या CBT EPFO इक्विटी किंवा इक्विटी-संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यायोग्य ठेवींपैकी 5 ते 15 टक्के असणारी गुंतवणूक मर्यादा 20 टक्के करण्यास मंजुरी देऊ शकते.29 आणि 30 जुलै रोजी होणा-या EPFO विश्वस्तांच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे
Published on: 19 July 2022, 04:54 IST