Others News

शेतकऱ्यांना विविध हंगामातील शेतीकामांसाठी भांडवलाची आवश्यकता असते. जे की त्यासाठी बँकेतून कर्ज काढायचे म्हणले की त्यासाठी किचकट प्रक्रिया आहे तसेच त्या प्रक्रियेस वेळ सुद्धा जास्त जातो. मात्र कृषी सुवर्ण योजना ही शेतकऱ्यांना तसेच कृषी उद्योजकांना फायदेशीर ठरू शकणार आहे. भारतात विविध खासगी बँक तसेच इतर संस्थेत सोने तारण ठेवून कर्ज देण्यात येते. जे की या योजनेत सुद्धा शेतकरी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकणार आहे. जमीन खरेदी, सिंचनव्यवस्था, यंत्रसामग्री आणि कच्चा मालाच्या खरेदी तसेच पीक लागवड या अनेक कामांसाठी शेतकरी सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकणार आहे.

Updated on 22 April, 2022 2:47 PM IST

कृषी सुवर्ण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये (२०२१) :-

१. कर्ज रक्कम -१००० ते २५००००० रुपये.
२. व्याजदर - प्रतिवर्षं ७ टक्के.
३. परतफेड - सुलभ हप्त्यात.
४. तारण वस्तू - सोन्याची गुणवत्ता तसेच वजन.
५. कालावधी - १ महिने ते ३६ महिने.
६. कर्ज प्रक्रियेसाठी घेण्यात येणारे शुल्क - कर्ज रकमेच्या १ टक्का.

  •  कृषी सुवर्ण योजनांद्वारे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेत कागदपत्रे सादर करून कर्ज पुरवठा केला जाणार आहे.
  • बाजारात सोन्याचा जो भाव चालला आहे त्या आधारावर कर्ज भेटणार आहे.
  • जो व्यक्ती कर्ज काढणार आहे त्याच्या नावावर शेतजमीन असणे गरजेचे आहे. बँकेत तसा पुरावा जमा करावा लागणार आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना फक्त घ्यावा यावा अशी अट देखील घालण्यात आली आहे.
  • सामान्यतः प्रति वर्ष कर्जावर ७ टक्के व्याजदर हा आकरला जातो.प्रत्येक बँकेनुसार कर्जाचा व्याजदर, पात्रता निकष, परतफेडीचा कालावधी, कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क तसेच त्यांची कागदपत्रे विविध असतात.

पात्रता निकष :-

१. कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
२. अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.
३. शेती तसाच कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय असावा.
४. बँकेद्वारे मागणी केलेल्या केवायसी तत्वांची पूर्तता करावी.

आवश्यक कागदपत्रे -

१. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
२. अचूकपणे भरलेला अर्ज.
३. अर्जदाराची केवायसी कागदपत्रे जशी की पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पाणी किंवा वीज बिल.
४. अर्जदाराच्या नावे असलेली जमिनीची कागदपत्रे.
५. पीक लागवड पुरावा.
६. वित्तीय संस्थेद्वारे मागणी केलेली इतर कागदपत्रे.

यासाठी मिळेल कर्ज -

१. पीक लागवड तसेच त्याचे व्यवस्थापन.
२. शेतीसाठी यंत्रसामग्री, जमीन खरेदी, सिंचन उभारणी.
३. फलोत्पादन, कृषी उत्पादने वाहतुकीसाठी.
४. दूध व्यवसाय, जनावरांच्या खरेदीसाठी, कुक्कुटपालनासाठी कोंबड्या तसेच शेड उभारणी.
५. मत्स्य व्यवसायामध्ये तलाव बांधणी, मत्स्य खरेदी तसेच शेळ्या-मेंढ्या खरेदी.

योजनेचे फायदे -

१. कागदपत्रांची पूर्तता कमी.
२. आवश्यक कागदपत्रे जमा केली की कर्ज मंजुरी त्वरित.
३. कमी व्याजदर.
४. सुलभ कर्ज वितरण.
५. तारण ठेवलेले सोने बँकेत पूर्णतः सुरक्षित.

English Summary: Good news for farmers! The loan will be met through Krishi Suvarna Yojana, but these documents will have to be fulfilled
Published on: 22 April 2022, 02:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)