काळाच्या ओघानुसार शेतकरी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर वापरत आहे. शेती कामासाठी सध्या ट्रॅक्टर हे यंत्र गरजेचे आहे. जे की ट्रॅक्टर ही काळाची गरज आहे. मात्र शेतकरी वर्गातील अनेक असे शेतकरी आहेत ज्यांची अर्थिक परिस्थिती एवढी ठीक नाही की ते ट्रॅक्टर घेण्याइतके पैसे खर्च करतील. मात्र तुम्ही पंतप्रधान ट्रॅक्टर योजना याबद्धल ऐकले आहेत का? आज आपण पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना २०२२ चा फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत.
प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना 2022 :-
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना २०२२ ही प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी वर्गासाठी आहे. जे की या योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर त्यांना बँकेच्या मार्फत अनुदान दिले जाते. तसेच या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टरसह जी कृषी उकरने आहेत ती सुद्धा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून २० ते ५० टक्के अनुदान दिले जाते.
प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेचा फॉर्म कसा भरायचा :-
१. जर तुम्हाला पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना २०२२ चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळच्या बँकेशी किंवा ब्लॉक ऑफिसरशी संपर्क साधावा लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला तुमच्या राज्याच्या योजनांतर्गत अर्ज करावा लागणार आहे.
२. तुम्ही पंतप्रधान किसान ट्रॅक्टर या योजनेचा लाभ फॉर्म मशिनरी बँक अंतर्गत घेऊ शकता तसेच यासाठी तुम्हाला शासनाकडून ५० ते ८० टक्के अनुदान सुद्धा दिले जाणार आहे.
३. या योजना अंतर्गत जे शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जे भेटणार आहे ते अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मात्र एका कुटुंबातून एक च शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
४. पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेसाठी तुम्हाला कृषी विभाग, लोकसेवा केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता. जनसेवा केंद्राला भेट दिल्यानंतर तुम्हाला अर्ज प्राप्त करावा लागणार आहे.
५. ज्यावेळी तुम्ही अर्ज प्राप्त करणार आहात त्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे तसेच या योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती सुद्धा लोकसेवा केंद्रात जमा करावी लागतील. तर काही राज्य अशी आहेत जे की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील आहे हे सुद्धा त्यामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.
पंतप्रधान ट्रॅक्टर योजना अनुदान माहिती :-
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना २०२२ अंतर्गत शेतकऱ्यांना शासनाकडून २० ते ५० टक्के अनुदान मिळणार आहे जे की प्रत्येक राज्यानुसार हे अनुदान कमी जास्त असू शकते. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी तसेच कृषी उपकरणासाठी जे अनुदान शेतकऱ्यांना शासनाकडून भेटले आहे ते अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जो अर्जदार आहे त्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
पीएम योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
१. जिरायती जमीन
२. आधार कार्ड
३. जमिनीची कागदपत्रे
४. बँक खाते
५. मोबाईल नंबर
६. पासपोर्ट आकाराचा फोटो
७. ओळखीचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
Published on: 05 March 2022, 09:34 IST