Others News

शेतकऱ्यांचे अर्थकारण हे शेतीच्या उत्पादनावर अवलंबून नसते तर बाजारात काय दर चालू असते या दरावर अवलंबून असते. शेतकरी आपल्या शेतातील माल बाजारात कोणत्याही दराची चौकशी न करता विकतो. काळाच्या बदलानुसार आता मोबाईलवर सर्व गोष्टी मिळत आहेत. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने एक अॅप तयार केले गेले आहे जे की या अॅप वरून घरबसल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर समजणार आहेत. या अ‍ॅपमुळे विविध बाजार समितीमध्ये असणारे दर तर समजणार आहेतच पण त्याचबरोबर बाजारामध्ये शेतमालाची आवक जावकबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना सहजपणे कुठे कोणता दर आहे हे समजणार आहे.

Updated on 01 February, 2022 6:27 PM IST

गुगल प्ले स्टोअरवर MSAMB या नावाने अ‍ॅप :-

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने जे अ‍ॅप तयार केले आहे ते अॅप आपणास पाहिजे असेल तर ते आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाऊनलोड करावे लागणार आहे. तुम्ही यासाठी प्ले स्टोअर ला जाऊन MSAMB हे टाइप करून ते अ‍ॅप डाउनलोड करावे. हे अॅप डाउनलोड करून त्यामध्ये जी माहिती आहे ती तुम्ही स्वतः भरावी त्यानंतर तुम्ही याचे सदस्य होणार आहात.

MSAMB द्वारे तुम्हाला भेटणार याबद्धल माहिती :-

शेतकऱ्यांना MSAMB या अॅपद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पणन मित्र मासिक तसेच राज्यामध्ये जेवढया बाजार समित्या आहेत त्यांची माहिती, शेतीमालाचा विक्रेता आणि खरेदीदार याची माहिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने जेवढे उपक्रम राबिवली आहेत त्या उपक्रमांबद्धल माहिती इ. सर्व या अॅपद्वारे शेतकऱ्यांना भेटणार आहे.

शेतकऱ्यांच्या हीताचे अ‍ॅप :-

काळाच्या ओघात शेतपद्धती मध्ये जे बदल होत आहेत तसेच तंत्रज्ञानात जे बदल होत आहेत त्याचा स्वीकार शेतकऱ्यांनी करावा त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होईल. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने जे अ‍ॅप तयार केले आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच जेवढे जेवढे उपक्रम राबिवण्यात येतील याची माहिती सुद्धा शेतकऱ्याना या  अ‍ॅपच्या  आधारे भेटणार आहे. या अ‍ॅपच्या उदघाटन दरम्यान सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा.

English Summary: Good news for farmers! Now you can understand the rates in the market, you have to download this app
Published on: 01 February 2022, 06:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)