Others News

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून नेहमी वेगवेगळ्या योजना काढत असते, त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना मार्फत सरकार दरवर्षी त्या योजनेत बसत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ६००० जमा करते. या सर्व माध्यमांवर विश्वास ठेवत मोदी सरकार या योजनेत सुविधा दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्यांनी ही सुविधा दुप्पट केली तर शेतकऱ्यांना वर्षाला १२००० रुपये खात्यावर येऊ शकतात.

Updated on 29 August, 2021 2:21 PM IST

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून नेहमी वेगवेगळ्या योजना काढत असते, त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक  शेतकऱ्यांसाठी  फायदेशीर  योजना  आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना मार्फत सरकार दरवर्षी त्या योजनेत बसत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ६००० जमा करते.या सर्व माध्यमांवर विश्वास ठेवत मोदी सरकार या योजनेत सुविधा दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्यांनी ही सुविधा दुप्पट केली तर शेतकऱ्यांना वर्षाला १२००० रुपये खात्यावर येऊ शकतात.

तुम्हाला सुद्धा या योजनेचा फायदा घेता येणार:-

तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी योजना चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर नोंद करावी नाहीतर तुमच्या हातून ही मोठी संधी निघून जाईल.तुम्हाला जर या योजनेची नोंद करायची असेल तर प्रक्रिया खूप सोपी आहे जे की तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया करू शकता. तुम्ही या योजनेसाठी नोंद पंचायत सचिव किंवा स्थानिक सामान्य सेवा केंद्रात सुद्धा करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता:-

१. सर्वात आधी पीएम किसानच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे.

२. नंतर Farmer Corner वर जावा.

३. जेव्हा तुम्ही Farmer Corner वर जाणार त्यावेळी तिथे New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

४. क्लिक केल्या नंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा.

५. तिथे जो कॅप्चा कोड असतो ते टाकणे आणि राज्य निवड करणे. त्यानंतर पुढील प्रक्रिया वर जाणे.

 

हेही वाचा:मॅग्नेट सारख्या प्रकल्पाद्वारे उभारणार कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा – अजित पवार

 

६. यानंतर जो फॉर्म येईल त्यावर तुमची माहिती भरणे आवश्यक आहे.

७. तुम्हाला बँक खात्याचा तपशील व शेती संबंधी असणारी माहिती भरावी लागेल.

८. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही सबमिट करू शकता.

सूत्रांच्या माहिती नुसार बिहार राज्याचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व अर्थमंत्री निर्मला सीताराम यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आणि पीएम किसान सन्मान निधी योजनाची रक्कम दुप्पट करावी अशी मागणी केली मात्र त्यावर अजून कोणताही निर्णय आलेला नाही.

हप्ते कधी येतात माहीत आहे का?

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी योजना मार्फत वर्षाला ३ टप्त्यात ६००० रुपये जमा होतात जे की पहिला टप्पा १ डिसेंबर ते १ मार्च, दुसरा टप्पा १ एप्रिल ते ३१ जुलै आणि तिसरा टप्पा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर असा आहे अशा वर्गवारीत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६००० रुपये रक्कम जमा करते.

English Summary: Good news for farmers, now 12000 will be taken into account instead of 6000
Published on: 29 August 2021, 02:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)