Others News

केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्वाची भेट दिली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वेळेचा विचार केला तर सरकारने मार्चमध्ये डीए वाढवला होता.

Updated on 28 September, 2022 3:49 PM IST

केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्वाची भेट दिली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वेळेचा विचार केला तर सरकारने मार्चमध्ये डीए वाढवला होता.

नक्की वाचा:7th Pay Commission: महागाई भत्त्यापुर्वी केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट! कर्मचाऱ्यांनी मानले आभार

 तो एक जानेवारी दोन हजार बावीस पासून लागू झाला. मार्चमध्ये सरकारने डीए मध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. 31 टक्क्यांवरून 34% केली होती व आता चार टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर तो आता 38 टक्के होणार आहे. यामुळे आता देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ

महागाई भत्त्याची ही वाढलेली रक्कम जुलै पासून लागू होणार असून मागील महिन्याची थकबाकी देखील कर्मचार्‍यांना मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कामगारांचे पगार 6840 ते 27 हजार 312 रुपयांपर्यंत वाढणार आहेत.

कारण या वर्षी मार्चमध्ये डीए मध्ये सुधारणा केली होती, जी नंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या तीन टक्क्यांनी वाढून 34 टक्के झाली. आता चार टक्के वाढझाल्याने महागाईभत्ता सध्याच्या 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाला आहे.

नक्की वाचा:Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण! नवरात्रीत पेट्रोल डिझेल दरात दिलासा मिळणार? जाणून घ्या दर

English Summary: good news for central goverment employee growth da by 4 percent today
Published on: 28 September 2022, 03:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)