Others News

सध्या सणासुदीचा काळ तोंडावर आला असून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांनी त्यांच्या फेस्टिव्ह सेल सुरू केले आहेत. यामध्ये मोबाईलच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे गॅझेट कमी किमतीमध्ये घेण्याची संधी आहे. अगदी त्याच पद्धतीने शाओमी या कंपनीने देखील दिवाळी सेल आणला असून यामध्ये शाओमी कंपनीचा 'शाओमी 11T प्रो 5G' हा फोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी दिली आहे.

Updated on 24 September, 2022 2:29 PM IST

 सध्या सणासुदीचा काळ तोंडावर आला असून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांनी त्यांच्या फेस्टिव्ह सेल सुरू केले आहेत. यामध्ये मोबाईलच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे गॅझेट कमी किमतीमध्ये घेण्याची संधी आहे. अगदी त्याच पद्धतीने शाओमी या कंपनीने देखील दिवाळी सेल आणला असून यामध्ये शाओमी कंपनीचा 'शाओमी 11T प्रो 5G' हा फोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी दिली आहे.

या फोनच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 28999 मध्ये खरेदी करता येऊ शकणार आहे. हा फोन 39 हजार 999 रुपये किमतीमध्ये अगोदर सादर करण्यात आला होता.

नक्की वाचा:Mobile News: वनप्लसचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन करू शकता 17 हजारपेक्षा कमी किमतीत खरेदी, कसा ते जाणून घ्या?

सध्या शाओमी 11T प्रो 5G चे बेस व्हेरीयन्ट म्हणजेच आठ जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मॉडेल सध्या ॲमेझॉन आणि शाओमीच्या साइटवर 34 हजार 999 रुपयाच्या किमतीत लिस्टिंग असून 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज 36 हजार 999 रुपयांमध्ये आणि बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज 38 हजार 999 रुपयामध्ये लिस्टिंग आहे.

बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँक तसेच कोटक महिंद्रा बँकेचा ग्राहकांना हा फोन 28 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे परंतु कोणत्या बँकेला कोणती ऑफर मिळणार आहे याची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

नक्की वाचा:Business Idea : ऐकलं काय! 850 रुपयाचे मशीन घेऊन 'हा' व्यवसाय सुरु करा, लाखोंची कमाई होणार, डिटेल्स वाचा

 'शाओमी 11T प्रो 5G' स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

 या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्युशन सह 6.67 इंचाचा फुल एचडी+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे व त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे आणि तो डॉल्बी विजनला सपोर्ट करेल. याच्यात डिस्प्लेचा ब्राईटनेस 1000 नीटस आहे.

यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो 660 GPU, 3 जीबी वर्चुअल रॅम सोबत LPDDR5 रॅम देखील मिळेल. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरा असून यामध्ये प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सल सॅमसंग HM2 सेंसर आहे. सेकंडरी लेन्स 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगलची आहे.

आणि तिसरी लेंस ही 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आहे. या फोन 50 डायरेक्टर मोड उपलब्ध असतील या फोनचा कॅमेराने 8K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहात व समोर 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

एवढेच नाही तर या फोनमध्ये 120W हायपर चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh डुएल सेल बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोन मध्ये वाय-फाय 6,ब्लूटुथ, जीपीएस/A- जीपीएस/NAVIC, NFC, IR BLASTER आणि यूएसबी टाइप C पोर्ट आहे. तसेच यामध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

नक्की वाचा:Banking News: एसबीआयच्या 'या' महत्त्वपूर्ण योजनेला मुदतवाढ, गुंतवणूकदार घेऊ शकतात फायदा

English Summary: golden oppurtunity to buy this xiaomi smartphone in affordable price in sell
Published on: 24 September 2022, 02:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)