Gold-Silver Price: देशात दिवाळीमध्ये (Diwali) सराफा बाजारात नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. अनेक ग्राकानी सोने आणि चांदी त्यांच्या उच्चांकी दरापासून स्वस्त खरेदी केले आहे. तसेच अजूनही तुम्ही सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) दागिने खरेदी करण्याचाविचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
या व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली. शुक्रवारी सोने 277 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 221 रुपयांनी स्वस्त झाली. अशाप्रकारे, शुक्रवारी सोन्याचा भाव 50502 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 57419 रुपयांवर बंद झाला.
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे 24 कॅरेट सोने 277 रुपयांनी स्वस्त होऊन 50502 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 276 रुपयांनी स्वस्त होऊन 50300 रुपयांना झाले, 22 कॅरेट सोने 254 रुपयांनी स्वस्त होऊन 46260 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 207 रुपयांनी स्वस्त होऊन 37877 रुपयांना झाले, 14 कॅरेट सोने 162 रुपयांनी स्वस्त होऊन 29544 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
कच्च्या तेलाच्या किमती घटल्या! जाणून घ्या पेट्रोल डिझेलच्या दरात काय झाला बदल?
सोने 5700 रुपयांनी तर चांदी 22500 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोने सध्या 5698 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 22561 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या कुठे किती मिळतोय दर...
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
वाहनधारकांनो पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर; तेल भरण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर...
पावसाचा पुन्हा अलर्ट! देशातील 10 हून राज्यांना पाऊस झोडपणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Published on: 29 October 2022, 10:21 IST