काही दिवसांअगोदर सोन्याचे भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेले होते. अक्षरशः सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेले होते.परंतु संपूर्ण जगभरातील व्याज दरात सातत्याने होत असलेली वाढ आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर झाला.
या सगळ्या परिस्थितीमुळे जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोने तब्बल 15 महिने आणि देशांतर्गत बाजारात पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे.
या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील ही घसरण आणखी काही दिवस अशीच राहू शकते व येणाऱ्या तीन ते सहा महिन्यामध्ये सोन्याचे दर प्रतितोळा 48 हजार रुपये पर्यंत खाली येऊ शकतात.
सोन्याच्या किमती घसरण्याची चार प्रमुख कारणे
1- युरोपीय संघाच्या जे 27 देश आहेत त्या देशांनी रशियावरून असलेली सोन्याच्या आयातीवर बंदी उठवली आहे.त्यामुळे इतर देशांमध्ये सोन्याच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे.
2- सध्या महागाईने बऱ्याच विकसित देशांमध्ये वाढ झाल्यामुळे अशा देशात सोन्याच्या मागणीत घट झाली. त्यासोबतच चीन मध्ये देखील मागणी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
3- एक जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत युरोपियन सेंट्रल बँक अकरा वर्षात प्रथमच व्याजदर वाढवेल अशी दाट भीती आहे.
4- तसेच अमेरिकेचा विचार केला तर त्या ठिकाणी मार्च पासून ते आत्तापर्यंत व्याजदरात दीड टक्के वाढ, परत 27 जुलै रोजी पुन्हा एकदा असलेली 0.75 टक्के दरवाढीची शक्यता इत्यादी कारणे याला कारणीभूत आहेत.
नक्की वाचा:Petrol Diesel Rates : आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार? पहा आजचे नवीन दर
Published on: 22 July 2022, 06:14 IST