Others News

रशिया आणि युक्रेन यामध्ये पेटलेल्या युद्धाचा परिणाम हा जगभरातील सगळ्याच प्रकारच्या बाजारपेठांवर होताना दिसत आहे. याला जगभरातील सराफ बाजार देखील अपवाद नाहीत.

Updated on 25 February, 2022 11:24 AM IST

रशिया आणि युक्रेन यामध्ये पेटलेल्या युद्धाचा परिणाम हा जगभरातील सगळ्याच प्रकारच्या बाजारपेठांवर होताना दिसत आहे.  याला जगभरातील सराफ बाजार देखील अपवाद नाहीत.

रशिया आणियुक्रेन  मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर जगभरातील सराफ बाजारांमध्ये सोन्याच्या भावाने उसळी घेतली आहे. एकाच दिवसांमध्ये सोन्याच्या किमती मध्ये तब्बल अडीच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन प्रति 10 ग्रॅम सोने 51 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. येत्या आठवडाभरात दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही 55 हजारांच्या पुढेही जाऊ शकते असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

 आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती

 जर गुरुवारचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या किमती प्रति औंस 1950 डॉलर अशा उच्चतम पातळीवर गेल्या.तर भारतीय बाजारातही प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव हा 51400 वर गेला आहे.

सोन्या सोबतच चांदीच्या भावात देखील वाढ दिसून आलेली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 51 हजार 240 रुपये झाला. त्याच्या एक दिवस अगोदर 50 हजार 49 प्रति दहा ग्रॅम इतका होता. 22 कॅरेट दागिन्यांच्या सोन्याचा भाव 47 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रम होता. जर बुधवारचा विचार केला तर तो 45 हजार 845 रुपये प्रति दहा ग्रम होता. जर कांद्याच्या भावाचा विचार केला तर 23 फेब्रुवारीला तो प्रति किलोला 64 हजार 372 रुपये होता. तब्बल एका दिवसातच तो वाढून 66 हजार 501 रुपये प्रति किलो झाला. 

रशिया युक्रेन मधील युद्धामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नाही. युद्ध असेच सुरू राहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव एक आठवड्यात दोन हजार 150 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो. तर भारतीय  बाजारांमध्ये सोन्याचा भाव 55000 हजार प्रति तोळा जाईल. (स्त्रोत-दिव्य मराठी)

English Summary: gold rate boost in international market due to russia and ukrein war
Published on: 25 February 2022, 11:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)