Gold Price Update: देशातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी (Diwali). दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सोने आणि चांदीचे (Silver) दागिने खरेदी करत असतात. अशातच तुम्हीही सणासुदीच्या दिवसांत सोने (Gold) आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची घट झाली आहे. धनत्रयोदशी, दीपावलीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात (bullion Market) धातूंच्या किमतीत पुन्हा घसरण झाली.
पाच दिवसांपूर्वी म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात 1600 रुपयांनी तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची वाढ झाली होती, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याऐवजी चांदीच्या दरात आणखी घसरण झाली आहे. सणांव्यतिरिक्त लग्नसराईची खरेदी जोरात होईल. 5 ऑक्टोबर रोजी दोन्ही धातूंच्या किमती अचानक वाढल्याने खरेदीदारांची निराशा झाली होती.
राज्यात पावसाचा धुमाकूळ! पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला, हजारो क्विंटल लाल मिरची खराब; लाखोंचे नुकसान
गेल्या महिन्यात सोन्याचा भाव नऊ हजार रुपयांनी घसरला होता. सराफा संघटनेचे सरचिटणीस विश्वजित कुमार यांनी सांगितले की, सोने प्रति दहा ग्रॅम ५३ हजारांवरून ५२ हजारांवर आले आहे. तर चांदीचा भाव 63 हजार रुपये किलोवरून 60 हजार रुपयांवर आला आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे मंगळवारी 24 कॅरेट सोने 384 रुपयांनी स्वस्त होऊन 50736 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 382 रुपयांनी कमी होऊन 50533 रुपयांवर आले, 22 कॅरेट सोने 352 रुपयांनी स्वस्त होऊन 46474 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 288 रुपयांनी स्वस्त होऊन 38052 रुपयांना झाले आणि 14 कॅरेट सोने 288 रुपयांनी स्वस्त होऊन 29681 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याची सुवर्णसंधी
सोने 5400 आणि चांदी 22000 पर्यंत स्वस्त होत आहे
सोने सध्या 5464 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 22366 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
महत्वाच्या बातम्या:
पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, पहा तुमच्या शहरात किती रुपयांनी झाले महाग
आनंदाची बातमी! ड्रोन खरेदीवर सरकार देते 100% पर्यंत सबसिडी
Published on: 12 October 2022, 10:06 IST