Gold Price Update: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुम्हीही सोने आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोने (Gold) आणि चांदी त्यांच्या उच्चांक दरापासून स्वस्त मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण (Fall in price) सुरू आहे. याच क्रमाने सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोमवारी या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव ५१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ५६ हजार रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. सध्या सोन्याचा दर 5700 रुपयांनी तर चांदी 24000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोमवारी सोने 8 रुपयांनी स्वस्त होऊन तो 50430 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 431 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 50438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
मुसळधार पावसाचे थैमान! ४ हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या; महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली आपबीती
त्याचवेळी चांदी 399 रुपयांनी स्वस्त होऊन 55643 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी प्रति किलो १०४४ रुपयांनी स्वस्त होऊन ५६०४२ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
सोने 5700 आणि चांदी 24000 पर्यंत स्वस्त होत आहे
सोने सध्या 5770 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 24,337 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
पीएफ खातेधारकांनो फक्त करा हे काम मिळतील 7 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे सोमवारी 24 कॅरेट सोने 8 रुपयांनी स्वस्त होऊन 50430 रुपयांना झाले, 23 कॅरेट सोने 8 रुपयांनी स्वस्त 50228 रुपयांना झाले, 22 कॅरेट सोने 7 रुपयांनी स्वस्त होऊन 46194 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 6 रुपयांनी स्वस्त होऊन 37823 रुपयांना झाले आणि 14 कॅरेट सोने 4 रुपयांनी स्वस्त होऊन 29502 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी धो धो कोसळला, आजही अतिवृष्टीचा इशारा
देशात लम्पीचा कहर! ७० हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू; जाणून घ्या मृत्यूदर वाढतोय की कमी होतोय...
Published on: 18 October 2022, 11:11 IST