Others News

Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. कारण रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील इंधन दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे देशात सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तुम्हालाही सोने आणि चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Updated on 25 August, 2022 9:55 AM IST

Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. कारण रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील इंधन दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे देशात सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तुम्हालाही सोने (Silver) आणि चांदी (Silver) खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. सोने १५७ रुपयांनी महागले आहे तर चांदी १६६ रुपयांनी महागली आहे. मात्र सोने आणि चांदी खरेदी करायची हीच सुवर्णसंधी आहे. कारण सोने आणि चांदी त्यांच्या उच्चांक दारापासून स्वस्त मिळत आहे.

सध्या सोने 51600 रुपयांच्या खाली तर चांदी 55200 रुपयांच्या खाली विकली जात आहे. यासोबतच सोने 4600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 24800 रुपये प्रति किलो दराने आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त होत आहे.

MCX वर सोने आणि चांदीचे दर

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या विपरीत, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्ही एकत्र व्यवहार करत आहेत. आज एमसीएक्सवर सोने 51,318 रुपयांच्या पातळीवर असून, 99 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी 199 रुपयांनी घसरून 55,008 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Onion Price: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी! शेतकरी आक्रमक; सरकारकडे केली ही मागणी..

IBJA वर सोने आणि चांदीची स्थिती

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यापार आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी (24 ऑगस्ट) बुधवारी सोने 157 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 51578 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​उघडले. तर मंगळवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने प्रति दहा ग्रॅम २५ रुपयांनी महागले आणि प्रति १० ग्रॅम ५१४२१ रुपयांवर बंद झाले.

त्याच वेळी, आज चांदी 166 रुपये प्रति किलो दराने महाग झाली आणि 55166 रुपयांवर उघडली. तर मंगळवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 110 रुपयांनी स्वस्त होऊन 55000 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

अशाप्रकारे, आज २४ कॅरेट सोन्याचा नवीनतम भाव ५१५७८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, २३ कॅरेट सोन्याचा भाव ५१३७१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२४५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, १८ कॅरेट सोन्याचा भाव ३८६८४ रुपये प्रति १० ग्रॅम आणि सोन्याचे १४ कॅरेट 300173 प्रति 10 ग्रॅम आहे.

संकटांची मालिका संपेना! द्राक्ष लागवडीला कंटाळून शेतकऱ्याने १० एकर बागेवर फिरवला ट्रॅक्टर

उच्चांक दरापासून स्वस्त मिळतंय सोने आणि चांदी

सोन्याचा भाव सध्या 4622 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 24814 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे.

चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे. अशा परिस्थितीत, जे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही खरेदीची चांगली संधी ठरू शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची स्थिती

भारतीय सराफा बाजाराप्रमाणेच (Indian Bullion Market) आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा दर तेजीत आहे. यूएस मध्ये, सोने 0.25 डॉलरच्या वाढीसह $ 1,746.32 प्रति औंस दराने व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 0.08 डॉलरने घसरून $18.88 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

महत्वाच्या बातम्या:
राज्यावर अजूनही मुसळधार पावसाचे सावट! ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! मुसळधार पाऊस थांबताच कपाशीवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव...

English Summary: Gold Price Today: Increase in gold and silver prices!
Published on: 25 August 2022, 09:55 IST