नवी मुंबई: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याने ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. मात्र जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
सध्या सोन सर्वोच्च पातळीपेक्षा 5 हजार 300 रुपयांनी कमी दराने विकले जात आहे. आता सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. भारतात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 20 रुपयांची घसरण झाली आहे.
देशभरात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 51,180 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 46,880 रुपये आहे. मित्रांनो खरं पाहता 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 51,200 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 46,900 रुपये होता. म्हणजेच गेल्या 24 तासांत भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.
दिल्ली आणि चेन्नईमधील सोन्याच्या किंमती जाणून घ्या
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 52,200 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 47,850 रुपये आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 52,285 रुपये होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 47,927 रुपये होता.
मुंबई आणि कोलकाता मध्ये सोन्याचा भाव
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 52,200 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 47,850 रुपये आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 52,200 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 47,850 रुपये आहे.
भुवनेश्वरमध्ये सोमवारी 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 52,200 रुपये होती, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत सोमवारी 47,850 रुपये होती. 24 कॅरेट (10 ग्रॅम) आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याच्या भावात गेल्या 24 तासांत 110 रुपयांनी वाढ झाली आहे.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याची किंमत
भारतीय सराफा बाजारात, शनिवार आणि रविवार वगळता केंद्र सरकार ibja च्या वतीने दर जारी करतात. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय, वारंवार अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.com ला भेट देऊ शकता.
Published on: 01 June 2022, 09:08 IST