Gold Price: सणासुदीच्या मुहूर्तावर तुम्हीही सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आताच्या दिवसांत चांगली सुवर्णसंधी आहे. कारण सोने आणि चांदी त्यांच्या उच्चांक दरापासून (High rate) स्वस्त मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार होत आहे.
या व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या सोने 51800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 53700 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. एवढेच नाही तर सोने 5400 रुपयांनी तर चांदी 26200 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोमवारी सोने प्रति दहा ग्रॅम नऊ रुपयांनी स्वस्त होऊन 50,761 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 186 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 50770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
ज्यादा पैशाचे आमिष पडले महागात! शेतकऱ्यांची करोडोंची फसवणूक, शेतमाल घेऊन व्यापारी फरार
त्याचवेळी चांदी 333 रुपयांनी महागून 53696 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ८९१ रुपयांनी महागली आणि ५२३३६३ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे मंगळवारी 24 कॅरेट सोने 9 रुपयांनी स्वस्त होऊन 50761 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 9 रुपयांनी स्वस्त होऊन 50558 रुपयांना झाले, 22 कॅरेट सोने 8 रुपयांनी स्वस्त होऊन 46497 रुपयांना झाले, 18 कॅरेट सोने 7 रुपयांनी स्वस्त होऊन 38071 रुपयांना झाले आणि 14 कॅरेट सोने 6 रुपयांनी स्वस्त होऊन 29696 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
Rain Alrt: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार! यलो अलर्ट जारी
Today Horoscope: कुबेर ४ राशींच्या लोकांवर करणार धनाचा वर्षाव, या ३ राशींना मिळेल नोकरीत यश
Published on: 07 September 2022, 10:11 IST