Others News

नवमीच्या मुहूर्तावर बकरं बलिदान देण्याची प्रथा असते. दुर्गा पुजेसाठी बकऱ्याचा बळी देत असताना लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना झारखंडच्या गुमला जिल्ह्यात घडली आहे.

Updated on 06 October, 2022 10:27 AM IST

नवमीच्या मुहूर्तावर (occasion of Navami) बकरं बलिदान देण्याची प्रथा असते. दुर्गा पुजेसाठी बकऱ्याचा बळी देत असताना लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना झारखंडच्या गुमला (Gumala) जिल्ह्यात घडली आहे.

हे घडले असे...

बकरं बलिदान देत असताना बळी देण्यात येणाऱ्या हत्याराचा तुकडा कट होऊन तीन वर्षांच्या चिमकुल्याला लागला. त्यामुळे, तो लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, त्या मुलास रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

Petrol Price Today: या ठिकाणी पेट्रोल मिळतंय 84.10 रुपये प्रति लिटर दराने...

झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील एका गावात दुर्गापुजेत बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यानुसार, दोन बकऱ्यांचा बळी देण्यात आला होता.

मात्र, तिसऱ्या बकऱ्याचा बळी देत असताना हत्याचा तुकडा तुटला आणि जवळच उभा असलेल्या दिपक उरांव यांच्या ३ वर्षीय चिमुकल्यास लागला. त्यानंतर, काही वेळांतच लहानग्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिंदे सरकार रेशन कार्ड धारकांची दिवाळी करणार गोड! फक्त 100 रुपयात मिळणार या वस्तू

English Summary: goat was to be slaughtered, but the 3-year-old child was gone
Published on: 06 October 2022, 10:27 IST