सध्या देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होताना बघायला मिळत आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे इंधन दरवाढ. पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने मध्यमवर्गीय लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेणे पसंत करीत आहेत. त्यामुळे देशातील अग्रगण्य मोटोकोर्प कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करीत आहेत. सध्या देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती बघायला मिळत आहे, मध्यमवर्गीय लोक देखील इलेक्ट्रिक वाहनांना विशेष पसंती दर्शवित आहेत.
मित्रांनो जर आपणास देखील इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करायची असेल तर आम्ही आज आपल्यासाठी एक विशेष ऑफरची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आपणास इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल परंतु नवीन स्कूटर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा नसेल तर चिंता करू नका आजची या ऑफरनुसार कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. बजाज देशातील एक अग्रगण्य इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी आहे या कंपनीने आपल्या चेतक या इलेक्ट्रिक स्कूटर वर एक भन्नाट ऑफर आणली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर खूप कमी डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1 लाख 15 हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु जर आपल्याकडे एवढी मोठी राशी उपलब्ध नसेल तर आपण या स्कूटरला मात्र rs.12000 डाऊन पेमेंट भरून आपली बनवू शकता. ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर नुसार, जर आपण बजाज चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर 12000 रुपये डाउनपेमेंट भरून खरेदी केली तर आपणास या कंपनीशी संबंधित बँक एक लाख तीन हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. आपण हे कर्ज सुलभ हप्त्यांमध्ये फेडू शकता.
बारा हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर आपणास 3694 रुपयाचा मासिक हप्ता 3 वर्षापर्यंत भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे या स्कूटरसाठी उपलब्ध करून दिलेल्या कर्जावर 9.7 टक्केच व्याजदर घेतला जात आहे. त्यामुळे जर आपल्याला ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर आपण आपल्या जवळच्या डीलरशी या स्कूटरवर असलेल्या या ऑफरविषयी अवश्य विचारणा करा.
Published on: 23 February 2022, 06:20 IST