Others News

पीएम किसान योजनेसह क्रेडिट कार्ड, किसान मानधन योजनेचा लाभही घेता येणार आहे. भविष्यात याचा डेटावरून युनिक फार्मर आयडीही बनविण्याचा विचार सरकारचा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) ही मोदी सरकारची सर्वात मोठी आणि लोकप्रिय योजना आहे.

Updated on 23 May, 2020 4:47 PM IST


पीएम किसान योजनेसह क्रेडिट कार्ड, किसान मानधन योजनेचा लाभही घेता येणार आहे. भविष्यात याचा डेटावरून युनिक फार्मर आयडीही बनविण्याचा विचार सरकारचा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme)  ही मोदी सरकारची सर्वात मोठी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या अतंर्गत  सरकारने आतापर्यंत ७५ हजार कोटी रुपये दिले आहेत. आता पर्यंत या योजनेत ९ कोटी शेतकरी सहभागी झाले आहेत.

या योजनेतून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे सरकार तीन टप्प्यात देत असते. या योजनेच्या लाभार्थी आता अजून दुसऱ्या योजनांचाही लाभ घेऊ शकणार आहेत. पीएम किसान योजनेशी आता किसान क्रेडिट कार्डही जोडण्यात आले आहे. यामागे एक कारण आहे, किसान क्रेडिट कार्ड बनण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी हे जोडण्यात आले आहे. सरकार ज्या व्यक्तीला ६ हजार रुपये देत आहे, त्याला जर किसान कार्ड हवे असेल तर त्याला ते त्वरीत मिळावे . आता पर्तंय सारधरण ७ ते ८ कोटी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे.  या कार्डमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो.

2) पीएम किसान मानधन योजना

. जर आपण पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असाल तर आपल्याल पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेच कागदपत्र देण्याची गरज नाही. कारण शेतकऱ्याचे पुर्ण नाव सरकारकडे असते. या योजनेतून शेतकरी पीएम किसान योजनेतून मिळालेले पैसा थेट मानधन योजनेसाठी वळवू शकतो. यामुले आपल्याला इतर पैसा खर्च करण्याची गरज नाही. सहा हजार रुपयांमधूनच आपला हप्ता कट केला जाईल.  या मानधन योजनेतून आपल्याला वर्षाला ३६ रुपयांचे पेन्शन मिळते.

3)

मिळू शकते किसान कार्ड – मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या आकड्यांवरुन शेतकऱ्यांसाठी यूनिक फार्मर आयडी बनविण्याचा विचार करत आहे. पीएम किसान आणि राज्यांडून बनविण्यात आलेल्या भूमी रेकॉर्ड नोंदणीच्या डेटाबेसशी जोडून हे ओळखपत्र बनिवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी बनविण्यात आलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल.

English Summary: Get three more benefits trough pm kisan scheme, earn 3600 rupees without paying
Published on: 23 May 2020, 04:47 IST