Others News

देशात वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे लोक आता जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स (Bikes with high mileage) खरेदी करणे पसंत करत आहेत. आज आम्ही आपणास एका दमदार मायलेजच्या तसेच शानदार लूक्सच्या बाईकविषयी माहिती सांगणार आहोत. आम्ही ज्या बाईकविषयी बोलत आहोत तीं बाईक आहे हिरो फॅशन एक्सप्रो (Hero Fashion Expro). हिरो फॅशन एक्सप्रो हिरो कंपनीची सर्वात जास्त विक्री केली जाणारी बाईक आहे. आज आपण या बाईकच्या एका भन्नाट ऑफरविषयी जाणुन घेणार आहोत. हि बाईक जर आपणास खरेदी करायची असेल तर आपणांस 61000 रुपये एक्स शोरूम प्राईस (Ex-showroom price) मोजावी लागणार आहे. मात्र आम्ही ज्या ऑफर विषयी आपणास आज माहिती सांगणार आहोत त्याद्वारे ही बाईक आपण तिच्या एक्स शोरूम प्राईस पेक्षा निम्म्या किमतीत खरेदी करू शकता.

Updated on 09 January, 2022 7:24 PM IST

मित्रांनो जर आपणास हिरो पॅशन एक्स प्रो ही बाईक खरेदी करायची असेल आणि नवीन बाईक खरेदी करण्यासाठी एवढी मोठी अमाऊंट (Such a large amount) आपल्याजवळ नसेल तर आपण ही बाईक सेकंड हॅन्ड गाडी खरेदी विक्री करणारी साईट बाईक्स 24 या वेबसाइटवरून तिच्या निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. सेकंड हॅन्ड खरेदी-विक्री करणारी साईट बाईक्स 24 (Second hand buying and selling site bikes 24) यांनी नुकतीच आपल्या साइटवर या बाईक ला लिस्ट केले आहे. या साइटने हिरो पॅशन एक्स प्रो हि सेकंड हॅन्ड बाईक लिस्ट केली आहे. या साइटवर हिरो पॅशन एक्स प्रो हि बाईक अवघ्या 31 हजार रुपयात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसारहे बाईक 2013 या वर्षी विकत घेण्यात आली आहे आणि ही गाडी आत्तापर्यंत जवळपास एक लाख पाच हजार किलोमीटर धावली आहे.

या बाईक ची मालकी ही फर्स्ट ओनर (First Owner) आहे, तसेच या बाईकचे आरटीओ रजिस्ट्रेशन दिल्ली येथे केले गेलेले आहे (RTO registration has been done in Delhi). बाईक्स 24 ही कंपनी ह्या बाईकवर एका वर्षाची वारंटी देखील देत आहे तसेच कंपनी वॉरंटी समवेतच 7 दिवसाची मनी बॅक गॅरंटी देखील देत आहे. मात्र असे असले तरी वॉरंटी साठी कंपनीने काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. मनी बॅक ग्यारंटी साठी देखील कंपनीने काही अटी सांगितलेल्या आहेत.

मनी बॅक गॅरंटी (Money back guarantee) नुसार जर आपण ही बाईक खरेदी केली आणि आपणास ही बाईक पसंत पडली नाही तर आपण सात दिवसाच्या आत ही बाईक परत करू शकता. तसेच कंपनी आपल्याला आपले पैसे देखील लगेच रिटर्न करेल मात्र यासाठी कंपनीने काही अटी व शर्ती सांगितल्या आहेत त्याचे पालन आपणास करावे लागणार आहे. मित्रांनो हिरो पॅशन एक्स प्रो गाडी चांगली मायलेज देणारी आहे, हि गाडी 86 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देण्यास सक्षम आहे.

English Summary: get these bike only for 31000 at bikes 24
Published on: 09 January 2022, 07:24 IST