Others News

भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये हिरो ही एक नामांकित कंपनी आहे. या ऑटोमोबाइल कंपनीने टू व्हीलर सेगमेंटमध्ये आपले एक मोलाचे स्थान ग्रहण केले आहे. हिरो कंपनीची स्प्लेंडर ही बाईक देशातील मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत बनली आहे. हिरो स्प्लेंडर बाईकची मालेगाव मध्ये 84 हजार रुपयांपासून रोड प्राईस सुरु होते. मित्रांनो जर आपणास ही बाईक खरेदी करायची असेल मात्र आपल्याकडे नवीन बाईक खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसेल तर आपण ही स्प्लेंडर बाईक सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता.

Updated on 03 March, 2022 10:24 AM IST

Carandbike.Com या वेबसाइटने एका जुन्या स्प्लेंडर बाईक वर एक भन्नाट ऑफर आली आहे. या वेबसाईटने 44 किलोमीटर धावलेली आणि तीन वर्षे जुनी हिरो स्प्लेंडर बाईक आपल्या साइटवर लिस्ट केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक खूपच चांगल्या कंडीशन मध्ये आहे आणि या बाईकची किंमत मात्र पंचवीस हजार रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. Carandbike.Com या वेबसाइट नुसार ही बाईक 2019 यावर्षी खरेदी करण्यात आली आहे, म्हणजेच या बाईकला या वर्षी तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या कंपनीने ही बाईक 25 हजार रुपये किंमतीत विक्रीसाठी ठेवली आहेत. जर आपल्याला या बाईकमध्ये स्वारस्य असेल तर आपण थेट वेबसाइटवर जाऊन विक्रेत्याच्या तपशीलावर क्लिक करू शकता आणि येथून कॉलद्वारे तपशील आणि पुढील प्रक्रिया देखील पाहू शकता. 

या वेबसाईटवर लिस्ट केलेली स्प्लेंडर प्लस बाईक जवळपास तीन वर्षांत 44000 किमी धावली आहे. अनेक लोकांना लग्नामध्ये आहेर म्हणुन बाईक दिल्या जातात अशा बाईक भेट म्हणुन दिल्यानंतर जास्त वापरल्या जातं नाहीत, अशा अनेक बाइक्स या साईटवर उपलब्ध आहेत, कदाचित ही देखील अशीच एक बाईक असेल. मात्र असे असले तरी बाइक बघूनच आणि टेस्ट करूनच खरेदी करावी जेणेकरून फसवणुकीपासून वाचता येईल. ही बाईक आजही पहिल्या मालकाच्या नावाने रजिस्टर आहे. स्प्लेंडर बाईकचे इंजिन 97.2 cc आहे, हे इंजिन 8.36 PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

Hero Splendor बाईकचे मायलेज 80.6 किलोमीटर प्रति लिटर एवढे असते. या बाइकची ब्रेकिंग सिस्टिम उत्तम आहे या बाईकला रियर आणि फ्रंट मध्ये ड्रम दिले गेले आहेत आणि या बाईकचे टायर ट्यूबलेस असून आलोय व्हिल दिले आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही स्प्लेंडर बाईक खरेदी झाल्यानंतर हस्तांतरित करण्याचा खर्च खरेदीदाराना भरावा लागणार आहे. बाईकची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी carandbike.com ला भेट द्या. या बाईकची दिल्लीमध्ये नोंदणी केली गेली आहे.

English Summary: get splendor at 25000 know more about this special offer
Published on: 03 March 2022, 10:24 IST